धुंद पाऊस पहायला खिडकीत आलो,अन् मनातल्या मानत चिंब भिझलो.न जाणे कुठून एक सुगंधी आठवण स्मरली,मुग्ध कविता होउन ती समोर अवतरली.कांती तिची तेजस, बोलणे ते मधाळ,बोलके ते नयन, हसणे ते लडिवाळ.आनंद गगनाला तोकडं ठरवू लागला,क्षणोक्षणी मनाला माझ्या फसवू लागला.त्या अनोख्या नात्याची आता उब कळली,वाटलं आज ख~या प्रेमाची जादू कळली.हलुहलू आप्तजनांशी भेट घडवली,सगाल्यांच्या मानत ती हळूच दडली.पण नशीब मोठं मजेशीर असतं,सुखाशी त्याचं वैर असतं.ताटातूट झाली दोन भावनांची,एक झालेल्या दोन निष्पाप जीवांची.आता मात्र तुम्ही कंटाळला आहात,नेहमीचा विषय पाहून झोपाळला आहात.पण ती काल परत भेटली होती,अकस्मात कप्प्यातून अवतरली होती.पहिली काव्यक्षरे पाहून मन कोण आनंदले,खरच, पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले...पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले...!!!
No comments:
Post a Comment