तुला काहि होण्याआधी, मला व्हायला हवे रेतुझ्या जाण्याआधी, मीच, तिथे, जायला हवे रेआहे मनभर प्रिती पण नसे रे पुरावातुझ्या मनी आले प्रश्न उत्तरायला हवे रे“कधी होते असे” म्हणुन मी सांत्वना करतेपण दरवेळि माझेच हे व्हायला हवे रे ?माझ्या खिडकीत येतो रोज कावळा भुकेलामला येई तुझी सय, त्याला खायला हवे रेकिती समजूत घालू, किती खोटे खोटे हसूआता कधीतरी स्पष्टच सांगायला हवे रेमाझा आकांत ऐकून होती काऊ चिऊ गोळाकोणीतरी कडेवरी मला घ्यायला हवे रेनको नको जीव होतो जेव्हा बोटे वळतातनाहीसे होण्याचे मंत्रही जमायला हवे रेआता जाते माझ्या वाटेच्या काट्यांना गोंजारतरक्तगंधामागे तरी कोणी यायला हवे रेजातायेता लोक देती नको नको असे बोलअसे व्हायला हवे रे, तसे व्हायला हवे रेस्वर अंग रंग रस गंध फ़ुले देवीसाठीमंदीरातल्या मुर्तीचे गुण गायला हवे रेतुला होण्याआधी, मला, काहि व्हायला हवे रेतुझ्या जाण्याआधी, मीच, ’तिथे” जायला हवे रे
No comments:
Post a Comment