कधी न पाहिले स्वप्नी,कधी न होते ध्यानी मनी,असे प्रेम तुझे मला लाभले,अबोल सारे शब्द मग गीत होऊ लागले..माझ्या जिवनात आलीस तू अशी,की सारं काही बहरून गेलं,लोंखडाचं कणखर जगणं माझं,तुझ्या परिसस्पर्शाने सोनं होऊन गेलं..तुझ्या मिठीचा आधाराने मला,नव्या उमेदिची नव्या आशेची ग्वाही दिली,म्हणून मी ही प्रत्येक यशाच्या पुर्तीसाठी,मी परीश्रमाची अन सत्याची वाट धरली..तुझा तो होकार माझ्यासाठी,आजही अविस्मरणीय असा आहे,तुझ्या हातात मी दिलेलं फुल,अन त्याचा सुगंध अजूनही आपल्या आसपास आहे..तेव्हा कधी नजर ना लागो,आपल्या नात्याच्या या नाजूक कळीला,म्हणून मी नेहमी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो,तुझ्या गालावरच्या त्या होकाराच्या गुलाबी खळीला..आयुष्य माझे सुंदर आहे फक्त,तुझ माझ्या जिवनात असण्यावर,नाहीतर काय अर्थ उरतो श्वासांना,जेव्हा ह्रिदयच छातीत नसल्यावर...
No comments:
Post a Comment