-------------- तुला ठाऊक नसेल ...! ------------------तुझ्यासमवेत घालवलेल्या प्रत्येक क्षणांची आठवण आहे मला ,त्या सर्व आठवणीना कधीही न विसरलेला मी तुला ठाऊक नसेल ...!मला आणि तुला आवडणारे गाणे सारखेच ,तुला आवडणारे गाणे एकुनच झोपणारा मी तुला ठाऊक नसेल ...!गर्लफ्रेंड आहे का तुला कोणी ? विचारतात असे मला मित्र,उत्तर असलेल्या प्रश्नालाही "नाही" म्हणंणरा मी तुला ठाऊक नसेल ...!तू भेटणार म्हणून उमळलेल्या ,माझ्या मनातील मोगराचा सुवासही तुला ठाऊक नसेल ...!एरवी रिकामे असलेले पाकीट ही मी भरून ठेवले होते पैशाने,तुझा आनंदासाठी खर्च करणारा मी तुला ठाऊक नसेल ...!तुझी आठवण आली नाही असा दिवस अजुन आला नाही,माझीही आठवण व्हावी म्हणून "Orkut" वर टाकलेल्या फोटोचे कारणही तुला ठाऊक नसेल ...!बोलावेसे वाटते मला खूप तुझ्याशी,पण बोललोच कधी तर गोंधळलेला मी तुला ठाऊक नसेल ...!पण तू "नाही" म्हटल्यावर तुझ्या विरहात प्राण देणारामी तुला नक्कीच ठाऊक असेल ... असेल ना ?
No comments:
Post a Comment