कधी तू असा अबोल की..वाटते,शब्द द्यावेत तुला उधार,की,शब्दांचे वादळ तर नसते तुझ्या मनात ?कधी तू असा बोलका की..वाटते,तुझ्या शब्दांत वाहून जाईल मी,की,रित्या शब्दांचे तुझे गुपित मला समजत नाही ?कधी तू असा शांत की..वाटते,तुझ्या ह्रदयात विरघळावे मी,की,वादळापूर्वीची ही शांतता तर नाही ?कधी तू असा अशांत की...वाटते,चंदन व्हावे मी तुझ्यासाठी,की,आगीशी संग मी करत तर नाही ?कधी तू इतका जवळ की...वाटते,तुझ्या श्वासांचीही चाहुल घेतेय मी,की,मला तुझ्यावर विश्वास नाही ?कधी तू इतका दूर की...वाटते,तुझ्याशिवाय दुनिया माझी रिती,की,आपल्यातले अंतर मी मोजलेच नाही ?कधी तू असा...कधी तू तसा..वाटतो तरीही, मला हवाहवासा,की,'प्रेमा'च्याच 'प्रेमा'त आहे मी ?पण तरीही,'तू' मला हवाहवासा..हवाहवासा
No comments:
Post a Comment