"एकाकी........."रतीब इथे आनंदाचा...सडा पडे प्राजक्ताचा...प्रज्वलित दिव्यांच्या वाती...स्नेह धारेच्या बरसाती...काळाची चक्रे फिरली...ना कुणी कुणाची उरली...झाहले विनाश परस्परांचे...मनही शहारे आरशांचे....डोईवर 'माये'चेच खूळ...घराणेही उखडे समूळ....चहूकडे काळाचे तांडव...उधळे काडीकाडीचा मांडव....मम देहीही थरकाप...निर्जीवास जडे या शाप...गातो आर्त वेदनेचा पोवाडा...मी भग्न एक वाडा.....मी भग्न 'एकाकी' वाडा.....
No comments:
Post a Comment