Wednesday, August 13, 2008

प्रेम.....

प्रेम.....
प्रेम आहे
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!
जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम....!
जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम....!
जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही,तिला जसेच्या तसे स्विकारता....,
तर ते आहे प्रेम....!
जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,
तर ते आहे प्रेम...!

No comments: