Posted: 19 Aug 2008 02:07 PM CDT
ताई रडली तो दिवस ——————————————————– आई गेली तेव्हा ताई आणि मी रडलोच नाही दोघेही अचानक मोठे झालो आणि पपा अचानक म्हातारे रात्री उशीरा येऊ लागले दाढी वाढू लागली केस गळायला आणि पिकायला लागले पाठीत पोक आणि तोंडाला नको नकोसा वास अडखळत बोलायचे अडखळत चालायचे लोक त्यांना टल्ली म्हणायचे जवळच रहाणारी आत्या रोज घरी यायची सकाळीच दोन वेळचं जेवण करायची आमचा राग राग करायची ताईला तर काहीही बोलायची नरुकाका - आत्याचे यजमान- मात्र खुप [...]
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment