माझ्या हृदयातली वेदना ...जेव्हा तुझ्या शब्दातून भळभळू लागली ,तेव्हा खूप वाईट वाटलं .....वाटलं जी आपलं सर्वस्व,तिच्या नशिबी आपण फक्त दुखःचं देणार ??का नाही सुचत आपल्याला काही सुखद .... आल्हाद दायक ....अगदी प्रेमकाव्य नाही तर निदानएखादं निसर्ग वर्णन वगैरे ....पण तिच्यापासून काहीच लपून राहात नाही ...ती अगदी मनापासून हसलीम्हणाली ,वेडा आहेस ...अरे वातीच्या आयुष्याचं सार्थक आहे ,ते, ती तेवती असण्यातच .....जर वात म्हणाली की मला ज्योतीचे चटके बसतात ...तर मग .... जगात प्रकाश असेल का ????
No comments:
Post a Comment