पावसात.....
काल रात्रीच्या पावसात.....
एक सर अशी येऊन गेली,
मनातल्या तुझ्या आठवणींना
चीम्ब -चीम्ब करून गेली....
थंड वाऱ्याची झुळूक
अंगाशी झोंबून गेली
त्या वाऱ्यानेही मला
तुझ्याच स्पर्शाची चाहूल दीली...
मग पावसाने आपला जोर कमी केला,
आणी मी त्याच्या सरी झेलण्याचा खेळ सुरु केला
तुझ्या हृदयस्पर्शी आठवणींच्या या पावसात,
जीव कसा बघ न्हावूनी गेला....
असं वाटलं... हा आठवणींचा पाऊस नसून, प्रेमाचा पाऊस असावा
जसा थंड वाऱ्याच्या ऐवजी तुझाच गरम स्पर्श असावा...
मग चीम्ब-चीम्ब व्हायला आठवणींची गरज नाही
आणी साथ तुझी असल्यावर मला काहीच अशक्य नाही....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment