असावी कुणीतरी…तुझ्यामधे मी हरवून गेले असं म्हणणारी…
असावी कुणीतरी…
सकाळी साखरझोपेतून उठवणारी,
आणि तिचा चेहरा पाहताच माझी कळी अलगद फ़ुलवणारी
असावी कुणीतरी…
सकाळी प्रेमाने चहा करून देणारी ,
आणि प्रेमळ डोळ्यानी माझ्याकडे पाहत राहणारी…
असावी कुणीतरी…
मी जवळ नसताना…माझ्यासोबत जगलेल्या
प्रत्येक क्षणाची आठवण काढत राहणारी…
असावी कुणीतरी…
माझा वेडेपणा पाहून गालातल्या गालात हसणारी,
आणि माझ्या शब्दांना कानात साठवून गोड प्रतिसाद देणारी…
असावी कुणीतरी…
भरलेच जर कधी माझे डोळे
तर हलकेच आसवांना पुसणारी…
असावी कुणीतरी…
माझ्या मनात रमणारी,
अंधा-या वाटेवरही माझ्यासोबत येणारी…
असावी कुणीतरी…
पलिकडच्या किना-यावर माझी वाट पाहत थांबणारी,
उशीर झाला म्हणुन उदास आणि बेचैन होणारी…
असावी कुणीतरी…
असावी कुणीतरी…तुझ्यामधे मी हरवून गेले असं म्हणणारी…
खरचं…असावी कुणीतरी
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment