Wednesday, May 12, 2010

एक दिवस असा होता की.....

एक दिवस असा होता की




एक दिवस असा होता की



कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं



गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं



मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं





एक दिवस असा होता की



कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं



वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं



फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं





आज दिवस असा आहे की



कुणीतरी विणाकारण मला टाळायचं



नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं



वेळ देऊनही फोन नाही करायचं





आज दिवस असा आहे की



मी माझं नातं मनापासुन जपायचं



मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं



पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं





आज प्रश्न असा आहे की



का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं



का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं



का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं





मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं



दु:खातही आपण मात्र हसायचं



कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं



चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

आठवण माझी आली कधी ...

आठवण माझी आली कधी



तर पापण्या जरा मीटून बघ.

सरलेल्या क्षनान्म्धले

संवाद जरा आठवून बघ.



आठवण माझी आली कधी

तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ

त्या पाउल वाटेवरती

उमटलेली आपली पाउले बघ.



आठवण माझी आली कधी

तर उडणार्या पक्षांकडे बघ.

त्यांच्यासारखाच माझ मन

तूज्याकडे धावत आलेलं बघ.



आठवण माझी आली कधी

तर चांदण्या जरा मोजून बघ.

चांदण्या ratri घेतलेल्या शपथेचा

शब्द न शब्द आठवून बघ.



आठवण माझी आली कधी

तर सागरकिनारी जाऊन बघ.

हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा

परतणाऱ्या नीराश लाटेच वीव्ह्लन बघ.



आठवण माझी आली कधी

तर साद मला घालून बघ

तुझ्या अवतीभोवती फीरणार

माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.

काहितरी वेगळ करायचय........

काहितरी वेगळ करायचय........




ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय

पाणवठा जरी गढुळ असला तरी

पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.



काहितरी वेगळ करायचय........



आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय

पानांच्या जाळीवर बसुन उडायचय

मिटलेल्या श्वासांना आता

अस्तित्वातात आणायचय.



काहितरी वेगळ करायचय........



स्वप्नांच्या देशात भटकायचय

प्रयोगानिशी शोधायचय

भवनेच्या पंखात बळ घेऊन

पुन्हा मायदेशी परतायचय.



काहितरी वेगळ करायचय........



चिखलातल्या कमळाला फुलवायचय

सुकलेल्या फुलांना जगवायचय

माती रुक्ष असलि तरी

मातीतल्या माणसांसाठी जगायचय

चार पावलं आपण सोबत चालत जाऊ....

चार पावलं आपण


सोबत चालत जाऊ

तुझे आणि माझे सूर

कुठवर जुळतात पाहु...



अर्थात जमत असेल तर चल

मी आग्रह करणार नाही

आज तरी, "तुला यावच लागेल,

असा हट्ट ही धरणार नाही



पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा

व्यक्‍त करणं बरं असतं

कारण इथून तिथून ऐकलेलं

सारंच काही खरं नसतं



कुणी कुणाला का आवडावं

हे सांगता येत नाही

चार चौघांना विचारून कुणी

हृदय देत नाही



तसंच काहीसं माझं झालं

त्याच धुंदीत propose केलं

जवळ अशी कधी नव्हतीसंच

propose ने आणखीच दूर नेलं



जे झालं ते वाईट झालं

पण झालं ते बरंच झालं

खरं सांगणं गुन्हा असतो

एव्हढं मात्र लक्षात आलं



जाऊ दे,

झालं गेलं विसरून जा

मागे न वळता चालत राहा

मला विसर असं मी म्हणणार नाही

पण तू तो प्रयत्न करून पाहा...



थांब...

इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय

पण धन्यवाद; तू इथवर आलीस...

सारं आयुष्य नसलीस तरी

चार पावलं माझी झालीस....

Wednesday, May 5, 2010

मुक्त कंठाने रडतो मी ……..

रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी


विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी

का तूला आठवू… हाच विचार करतो मी

अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी



नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे

मनात माझ्या रोज ठरवतो मी

तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात

रोज तिथे एकांतात रडतो मी



नको दिसावा तुझा चेहरा

रोज देवास पाया पडतो मी

पाकिटात्ला तुझा फोटो फाड़तान्ना

गलात्ल्या त्या खलीवर रडतो मी



एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ

म्हणुन कपाटातल्या सरव्या वस्तु काढतो मी

प्रत्येक वस्तु एकदा ह्रुदयाला लाउन

मुक्त कंठाने रडतो मी ……..

असावी कुणीतरी…

असावी कुणीतरी…तुझ्यामधे मी हरवून गेले असं म्हणणारी…


असावी कुणीतरी…

सकाळी साखरझोपेतून उठवणारी,

आणि तिचा चेहरा पाहताच माझी कळी अलगद फ़ुलवणारी



असावी कुणीतरी…

सकाळी प्रेमाने चहा करून देणारी ,

आणि प्रेमळ डोळ्यानी माझ्याकडे पाहत राहणारी…



असावी कुणीतरी…

मी जवळ नसताना…माझ्यासोबत जगलेल्या

प्रत्येक क्षणाची आठवण काढत राहणारी…



असावी कुणीतरी…

माझा वेडेपणा पाहून गालातल्या गालात हसणारी,

आणि माझ्या शब्दांना कानात साठवून गोड प्रतिसाद देणारी…



असावी कुणीतरी…

भरलेच जर कधी माझे डोळे

तर हलकेच आसवांना पुसणारी…



असावी कुणीतरी…

माझ्या मनात रमणारी,

अंधा-या वाटेवरही माझ्यासोबत येणारी…



असावी कुणीतरी…

पलिकडच्या किना-यावर माझी वाट पाहत थांबणारी,

उशीर झाला म्हणुन उदास आणि बेचैन होणारी…



असावी कुणीतरी…

असावी कुणीतरी…तुझ्यामधे मी हरवून गेले असं म्हणणारी…

खरचं…असावी कुणीतरी

आज असे वाटले

आज असे वाटले, खुप खुप रडावे,


कोणास ठाऊक का पण, देवाचा पाया पडावे.



आज असे वाटले, वेड माला लगावे,

मग मी मनमोकले वेड्यासारखे हसावे,



आज असे वाटले, या अंधारातील जग्नायातुना बाहेर पडावे,

मन सारे मोकले करून उंच उंच उडावे.



आज असे वाटले, खुप खुप कही खावे,

मी पण बाकि जनंसरखे जाड जुड़ वहावे.



आज असे वाटले,मी पण स्वप्ना बघावे,

मनसोक्त पखारासरखे या विश्वायत बगादावे.



आज असे वाटले,तुझाशी भरपूर बोलावे,

अणि बोलता बोलता सारे आयुष्य सरावे.



आज असे वाटले,की मी तुझाची वाट पाहत राहिले,

आणि त्यामुले आयुष्यात बराच काही सोसले.



आज असे वाटले,की अत तरी मी तुला विसरावे,

अत तरी मी पुन्हा नव्याने जगावे,

अत तरी मी पुन्हा नव्याने जगावे

आयुष्यात काही क्षण असेही येतात …………..

आयुष्यात काही क्षण असेही येतात …………..




ज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही

अन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधी



कधी रक्ताची नातीही नकळत तुटतात

तर कधी बिनरक्ताचीही सहज जपली जातात



कधी ओळखीचे चेहरेही परके भासतात

तर कधी अनोळखीही गर्दीत आपलेसे वाटतात



आसवे ज्याच्यासाठी गळतात तो न जाणे त्याची किंमत

अन ज्याच्याकडे होते दुर्लक्ष तो मोजतो आपल्या हास्याची किंमत



कधी जन्मभर साथ देऊनही माणूस नाही कळत

तर कधी क्षणातच अनोळखीही दाखवतो आपली ओळख



कधी सोबत असूनही प्रेम आटते

तर कधी विरहहि संगमाप्रमाणे भासते



इथे लोक माणसांपेक्षा दगडांवर खर्च करतात

नंतर बाराव्याचे जेवणही समारंभपूर्वक देतात

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….


आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

अशा वेळी -

गंध आवडला फुलाचा म्हणून

फूल मागायचं नसतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं…



परक्यांपेक्षा आपलीच माणसं

आपल्याला नेहमी दगा देतात

एकमेकांच्या पाठीवर मग्

नजरे आडून वार होतात…



भळभळणा-या जखमेतून

विश्वास घाताचं रक्त वाहतं

छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा

आपणच पुसायचं असतं…



अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं…



आपलं सुःख पाहण्याचा तसा

प्रत्येकाला अधिकार आहे…

पण्; दुस-याला मारुन जगणं

हा कुठला न्याय आहे…



माणूस म्हणुन माणसावर

खरं प्रेम करायचं

आपल्या साठी थोडं,

थोडं दुस-यासाठी जगायचं…



जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं…



आपल्याला कोणी आवडणं

हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं

आकर्षणाचं स्वप्नं ते

आकर्षणंच असतं…



मान्य आहे,

आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…

पण् जे चकाकतं

ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं…



मन् आपलं वेडं असतं

वेडं आपण व्हायचं नसतं…

मन मारुन जगण्यापेक्षा

वेळीच त्याला आवरायचं…



अशावेळी…

आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं…

कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार

कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार


हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्…



कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार

फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्…



कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,

चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार…



कुणीतरी हव असत ,आपल म्हननार

नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार…



कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,

कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार…

कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,

कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार…



कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,

स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार…



कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,

माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार…



कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,

माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार…



कुणीतरी हव असत,मला समजुन् घेनार,

आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का विचारणार…

कपडे स्वच्छ ठेवून कधी चिखलात पडता येत नाही....

कपडे स्वच्छ ठेवून कधी चिखलात पडता येत नाही

आरसा पुढे ठेवून स्वतः पासून दडता येत नाही…



प्रेम आणि स्वातंत्र्य हे विरूध्दार्थी शब्द आहेत

पंखात पंख घालून कधी, गगनात उडता येत नाही…



मनात जिद्द असेल तर “एव्हरेस्ट” सुद्धा पार होतो

मेलेल्या मनाला साधा, जिना चढता येत नाही…



आयुष्य धरायला गेलात तर, चावतं एखाद्या कुत्र्यासारखं

पण पळून जाईल ह्या भितीने, त्याला सोडता येत नाही…



पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा उपयोग नाही

जेव्हा तुम्हाला माणसाला, माणूस जोडता येत नाही…



आले जर डोळ्यात पाणी तर “हारला हा” म्हणून दैव सुखावेल

म्हणूनच मला ईच्छा असून, मोकळं रडता येत नाही…

Monday, May 3, 2010