Saturday, April 17, 2010

तुझी भेट होते तेव्हा

तुझी भेट होते तेव्हा


 तुझी भेट होते तेव्हा, माझा मीच नसतो,

तुझ्यातच गुंततो इतुका कि, इतरांत कमीच असतो.



तू चुकतेस वाट, मिलनाची कधी कधी,

पण त्या वाटेवरती, मी नेहमीच असतो.



विचार असतात मनात, केवळ तुझेच दाटलेले,

ते नसतात तेव्हा बहुदा, मी रिकामीच असतो.



तू असताना वर्तनुकीचीही, पायरी ठरलेलीच असते,

तुझ्या उपरोक्षही मनातला, भाव संयमीच असतो.



तुझे सुख वेचताना कधी, काटा भासतो मीच स्वताला,

असावे कि नसावे जीवनी तुझ्या, मी या संभ्रमीच असतो

No comments: