एक मृतदेह पाहिला
आज एक मृतदेह पाहिला
मन एकदम दाटून आलं
ते शारीर जरी मृत असला
तरी खुप काही सांगुन गेलं
त्या मृत्देहानेही कधी बालपन अनुभवले असेल
तोही कधी शाळेत गेला असेल
मित्रांच्या सोबत तोही कधी खेळला असेल
खेळता खेळता तोही कधी रडला असेल
त्या मृत्देहानेहीे कधी तारुण्य अनुभवले असेल
तोही कधी कुणाच्या प्रेमात पडला असेल
प्रेमाचा विरह त्याने ही भोगला असेल
हळूच कधी एकांतात तोही रडला असेल
त्या मृत्देहानेही कधी संसार थाटला असेल
तोही कधी कुणाचा बाबा झाला असेल
मुलांसाठी त्याने खुप काही केला असेल
तीच मूलं दूर गेल्यावर तोही रडला असेल
मी ही क्षणभर थाम्बुन विचारल स्वतःला
माझे ही आयुष्य काही वेगळं जाणार आहे ?
मी ही त्या प्रवासाच्या वाटेवर आहे
आणि माझा ही प्रवास असाच थांबणार आहे .
वाटलं होतं ही त्याची शेवटची भेट असेल
पण नंतर उमगले मी किती चुकीचे आहे
आणि माझी अन् त्या मृत्देहाची
एके दिव्शि नक्कीच भेट होणार आहे
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment