भेटूया पुन्हा कधीतरी
कुठल्याशा अपुऱ्या कवितेच्या ओळीत
अर्धवट राहिलेल्या अनवट सुरावटीत
भेटूया पुन्हा कधीतरी
माझ्या हृदयात तुझ्यासाठी झुराझुरणाऱ्या झऱ्याकाठी
स्वप्नाच्या प्रदेशात अज्ञात तरुतळी
मग पडतील केशर उन्हाचे सडे
हळदुली शेतं मनात डोलायला लागतील
निळेशार स्फटिक-झरे झुलझुलातील
सारेच कसे मंतरलेले होऊन जाईल
त्यावेळी तू आणि मी
दोन प्रेमी युवामाळी
हातात हात घेऊन बसू
तुझ्या भस्मी डोळ्यांना
मी माझे डोळे देईन
गुलाबी ओठांना ओठ देईन..
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment