Friday, February 5, 2010

जमेल का रे तुला कधी

जमेल का रे तुला कधी
माझ्या डोळ्यात पहाण,
न सापडलेल्या प्रश्नांची उत्तर ,
त्याच्यामध्ये  शोधात राहणं .

जमेल का रे तुला कधी
माझ्याशी तासंतास गप्पा मारणं,
मी काहीही न बोलता
माझ्या मनातलं सर्व काही ओळखण

जमेल का रे तुला कधी
माझ्यावर नीतांत  प्रेम करणं,
हळुवार माझ्या भावनांना
अलगदपणे समजून घेणं

जमेल का रे तुला कधी
माझा हात हातात घेणं
मी तुझीच आहे
ह्याची शाश्वती मला देण.

जमेल का रे तुला कधी
माझ्य्पासून दूर होण
जमल तरी जाऊ नकोस
मलाच सहन होणार नाही तुझ दुरावण.

No comments: