Friday, February 5, 2010

गजरा

गजरा


भरुन आलेल्या ढगांनी
हलक्यानीच रडावं
आणि नेमकं तेंव्हाच वा-यचं
तुझ्या केसावर प्रेम जडावं

बेभानपणे वा-यानी मग
तुझ्या ओल्या केसात वहावं
आणि माझ्या जवळच्या गज-यानी मात्र
हळुच लपुन पहावं

तुझ्या केसातल्या रातराणी गंधानी
माझ्या नसानसात शिरावं
आणि त्या कस्तुरीच्या गंधापुढे
माझ्या भोळ्या गज-यानी हरावं

मग शहाणपणे गज-यानी
हळुच खाली पडावं
आणि तो पडलेला गजरा उचलायला
पाऊल तुझं अडावं

मग मान हलवुन नेहेमीसारखं
ते तुझं गजरा माळणं
आणि भान हरपुन नेहेमीसारखं
माझं वेड्यासारखं भाळणं

त्या भरुन आलेल्या ढगांनी
आता हलक्यानेच हसावं....
आणि तुझ्या केसावर वा-याआधि
माझ्या गज-याचम प्रेम असावं...

No comments: