Monday, February 22, 2010

ती समोर असली की..

ती समोर असली की..






ती समोर असली की..



ती समोर असली की

शब्द पाठमोरे होतात

सांगायचे खुप असले तरी

शब्दच दिसेनासे होतात



पण आज मी ठरवले होते

तिला सर्व काही सांगायचेच

वेडया ह्या माझ्या मनाला

तिच्यासमोर मांडायचेचं



हसु नको पण मी

आरशासमोर राहुन तयारी ही केली होती

सुरुवात नि शेवट ची

पुन्हा पुन्हा उजळणी केली होती



सगळं काही आठवत असुन ही

मी गप्पच होतो

तिच्या हालवण्याने

भानावर आलो होतो



ती माझ्याकडे बघत राहिली

न मी तिच्यात हरवलो

खोटं नाही बोलणार मी

पण पुन्हा सर्व विसरलो



ती च मग बोलली

निरव शांतता मोडत

तुझ्या मनात काय आहे

मला नाही का ते कळत..



तुझ्यात मनातलं मी

कधीच वाचलं होतं

माझं मन ही नकळत

तुझं झालं होतं



आता मात्र मी

घेतला तिचा हाती हात

आयुष्याभरासाठी द्यायची

ठरवली एकमेकांना साथ



आता मात्र मला

सर्व काही आठवले

ती समोर असली तरी

आपसुकच सुचत गेले

No comments: