आई खरच बोलायची
आई खरच बोलायची ,लहानपणी निम्बोनिच्यामागे मामा रहायचा चंद्राच्या दारी,
दिवस तेहि भलेच होते,जेव्हा पाठीवर दप्तराचे ओझे होते,
ते ओझे मनावरच्या ओझ्यापेक्षा हलकेच का नव्हते ?
त्या कमकुवत फांद्या झाडांच्या,ज्या आम्ही लीलया सर करायचो,
आणि आत्ता उंच-उंच इमारती ज्यांची मजले रोज चडूनही स्वतःचेच घर विसरायचो ,
ते शर्ट ज्याचा रंग मैदानाच्या माती समान असायचा,
आणि आता हा अवघडायला लावणारा उच्चभ्रू पेहराव,
त्या रात्री जेव्हा थकून बिछान्यावर आजीच्या गोधडीवर गाढ झोपी जायचो,
आणि आता आईच्या अंगाईच्या आठवणीने रात्रभर रडायचो,
आई खरच बोलायची,
जेव्हा कॉलेजला जाताना ती वाटखर्ची द्यायची,
जपून वापर,नीट रस्ता ओलांड,अभ्यासासोबत मजाही कर....उद्या हे सर्व जवळ नसेलही
आई खरच बोलायची....
No comments:
Post a Comment