मध्यमवर्गीय मुलीच जीण...
कस हे जीण आलय माझ्या वाट्याला
sophistication च्या मुखवाटयाखाली लागतय वावरायला...
मोकळीक तर सगळी आहे पण ती फक्त बोलायला
आड़ येते प्रतिष्ठा गेल की काही करून दाखवायला....
समाजात वावरताना स्वताला forward समजत राहायच
संस्काराच्या ओझ्याखाली आपल्या आशा आकांक्षाना दडपत राहायच...
नेहमी मान सन्मान, इज्जत प्रतिष्ठा या सगळ्यासाठी लढत राहायच
मग मला सांगा ना स्वतःसाठी दोन क्षण कधी जगायच...??
काय सांगू आई बाबा कित्ती कित्ती गमावलय
या अदृश्य बेड्यापायी तुमच्या मुलीने स्वतःच्या प्रेमाला बळी चढ़वलय...
पण आता मला कळलय स्वप्नापेक्षा वास्तव खुप वेगळ असत
म्हणुनच....
आता मला स्वतःला बदलायचय...
या स्वप्नवेडीला आता सत्यात जगायला शिकायचय....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment