Friday, February 5, 2010

तू विसरु शकणार नाही

तू विसरु शकणार नाही




तू विसरु शकणार नाही

नदीचा काठ चमचमत पात्र ,
उतरता घाट मोहरती गात्र .

तू विसरु शकणार नाही

कलंडता सूर्य लवंगति सांज
पक्षांच्या माला कुमकुमती झांज

तू विसरु शकणार नाही

सोनेरी उन वार्याची धुन ,
पावलांची चाहुल ओलखिची खून .

तू विसरु शकणार नाही

दिलेला शब्द ओझरता स्पर्श ,
दड्लेल प्रेम ओसरता हर्ष .

तू विसरु शकणार नाही

हातात हात आणि तुझ माझ हितगुज ,
आंब्याच्या झाडावर चिमन्याची कुजबुज .

तू विसरु शकणार नाही

भिजलेले डोळे विरलेले स्वप्न
भिजलेली वाट उरलेले प्रश्न

तू विसरु शकणार नाही आणि मी ही विसरु शकणार नाही

No comments: