Saturday, December 5, 2009

नातं तुझं माझं…….

“नातं आपलं कप आणि बशीचं..


कपानं सांडलं तर बशीनं साठवायचं..

रात्रीच्या गोष्टींना सकाळी गुपचूप आठवायचं..

आठवता आठवता हळूच गालात हसायचं..



नातं आपलं चहा अन् दुधाचं..

दुधाबरोबर चहानं आनंदानं उकळायचं..

कधी रुसायचं, कधी हसायचं,

पण शेवटी एकमेकांच्या मिठीतच विसावायचं..



नातं आपलं हळव्या प्रेमाचं..

एकाला लागलं कि दुसऱ्यानं कळवळायचं..

एकाच्या कर्तृत्वाला दुसऱ्यानं नावाजायचं..

एकाच्या सुखदुःखात दुसऱ्यानं स्वतःला हरवायचं..



नातं आपलं साता जन्माचं,

सख्या का रे अस्वस्थ व्हायचं..

कधी गुरगुरायचं,कधी गोंजारायचं..

पण आपण सदैव बरोबरच रहायचं..”

तुझ्या शिवाय जगण्याचा

विचार आता करतो ….

जीवन इथेच थांबलं बघ माझं

आता मरन्याचा विचार करतोे …..



तुझ्या पासून दूर जाताना

मन जड़ झाले होते

चेहरा हसरा दाखवला तरी

डोळे भरून आले होते …

No comments: