Tuesday, November 17, 2009

माझे ह्र्दय चिंब भिजवुन टाकनारा

माझे ह्र्दय चिंब भिजवुन टाकनारा
तरीही कोरडच आहे मी


पाऊस तुझ्या आठ्वनींचा………
दिवस रात्र कोसळणारा
तरीही तहानलेलाच आहे मी

पाऊस तुझ्या आठवणींचा……
तुझ्या खोट्या प्रेमाची साक्ष देणारा
तरीही प्रेम करतोच आहे मी………..तुझ्यावर

पाऊस तुझ्या आठवणींचा……
आसवांचे महापुर घेउन येनारा
तरीही हसतोच आहे मी

पाऊस तुझ्या आठवणींचा……
जगण्यापेक्षा मरण चांगल वाटायला लावणारा
तरीही जगतोच आहे मी
तरीही जगतोच आहे मी

No comments: