Wednesday, November 18, 2009

तुझा सहवास

तुझा सहवास

तुझ्या सहवासातील ते दिवस,
अजूनही मला आठवतात
कधी हसत, कधी रुसत,
जाणून बुझून तुझी आठवण करून देतात.

तुझेच विचार मनात घेऊन
जगत असते नव्या आशेने
सहवासातील ते क्षण टिपते मी स्वप्नाने

त्या स्वप्नाला जपण्यासाठीच
मला तुझा आधार हवा
म्हणूनच,.............
आयुष्यभरासाठी मला तुझा सहवास हवा.......

No comments: