Wednesday, November 18, 2009

तुझ्या सहवासाची जोड

माझ्या एका स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी
मनातील भावना सावरण्यासाठी
तुझी ती प्रेमळ साथ हवी

पण.............

तुझा अखेरचा निरोप घेताना
मनात जागी होते खंत नवी

तुझ्या सहवासात घालवलेल्या क्षणांना
मी कधीच विसरू शकत नाही....

म्हणूनच...........

माझ्या त्या स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी......

No comments: