श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली…….
खुप दिवसानंतर आज
मला ती पुन्हा दिसली
जेव्हा श्रावणाची पहीली सर
आज पुन्हा माझ्या दारी बरसली
खुप दिवसानंतर आज
मला ती पुन्हा दिसली
जेव्हा श्रावणाची पहीली सर
आज पुन्हा माझ्या दारी बरसली
फ़ेर धरुन ती आज पुन्हा
माझ्या अंगणी नाचली
तिन्ही विश्वाची दौलत
जणु तेव्हा मला
त्या तीन क्षणातच मिळाली
काय सांगु मित्रांनो…………..
ही ना नेहमी अशीच येते
वाट पाहणा-या कोरड्या
पापण्यांवर मग ती गार ओलवा रचते
ओला स्पर्श मी करताच
गुलाबी गाली मोहक लाजते
श्रावणाची ही सर जेव्हा
माझ्या दारी बरसते
आज ती पुन्हा तशीच आली
तिच्या गरम श्वासांच थबकणं,
तिच्या कोमल ओठांच थरथरणं
आज मी भिजल्या नजरेनं पाहील
तिच्या प्रेमाच्या प्रीतील आज मी,
ह्रुदयात जपुन ठेवलं
वाटलं जणु तेव्हा मनाची
हरऎक इछचा पुर्ण झाली
श्रावणाची ही पहीली सर जेव्हा
आज पुन्हा दारी आली …….
No comments:
Post a Comment