तू दिलेलं गुलाबाचं फुल
आजही जिवंत आहे माझ्याकडे
जगत तर आहे ते पण...........
विस्कटलेल्या पाकळ्यांच्या सहवासात.
जशी मी जगत आहे आज तुझ्या आठवणीच्या सहवासात
तू दिलेलं गुलाबाचं फुल
आजही तसच आहे ते
माझ्या डायरीच्या पानांमध्ये
रंग तोच पण फक्त उडालेला आहे.
जश्या आज तुझ्या मनात माझ्यासाठी असणार्या भावना....
तू दिलेलं गुलाबाचं फुल
आजही जिवंत आहे ते
पण फक्त मलूलपने जगत आहे
जशी मी..........
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment