आज पाहिल त्याला, तिची समजुत काढताना
तिच्या रागावलेल्या गालांवर, नंतर कळी खुलताना !
दुसरी एक ती, मॉलमध्ये तासनतास भटकत होती
त्याचासाठी काय घ्यावे, हेच तिची नजर शोधत होती
एका ठिकाणी फ़िरत होती, ती दोघं हातांत हात घालून
कुणाचेही त्यांच्याकडे लक्ष नाही, अशा वेड्या भ्रमात राहुन
मलाहि क्षणभर वाटल, कुणीतरी अस माझही असावं
तिनही मला, अगदी तळहातावरील फ़ोडाप्रमाने जपावं
मलाही वाटलं,
कुणीतरी माझ्यावरही, इतकं जिवापाड प्रेम करणार असाव
की माझ्यासाठी मग, स्वर्ग सुद्धा अगदी दोन बोट उरावा
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment