प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे.
तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. प्रेमाचे दिवस संपले की वाहतात संशयाचे वारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
त्याला भेटायाची वेळ ती मुद्दाम विसरते. त्याला काही केल्या तिचा जन्मदिन न स्मरे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
लग्न झाले की ओढ सरते, सुकतात सारे प्रेमाचे झरे. महिन्याचा खर्च भागवताना डोळ्यांसमोर दिसतात तारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
ओफिसमध्ये साहेबाची कटकट, घरात बायको आणि पोरे. पाहुणे येऊन त्रास देती तशात ही महागाई मारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
एकटेपणा जरी वाटला बरा, संध्या छाया भिववती मना. ते सूरकुतलेले मावळतीचे दिवस सांगा घालवावे कोणाच्या आधारे? तरीही म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment