Wednesday, July 8, 2009

आता तरी हसून ghe

आता तरी हसून घेआजचा दिवस मिळालाय तुलाआज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेसआता तरी हसून घे माहीत आसते सर्वाना फुलणारे फूल हे सुकनारेच असते किती ही ते जपले तरी कोमेजनारच असते आज फूललय ते सुगंधात न्हाऊन घे आजचा दिवस मिळालाय तुलाआज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे काही बरोबर आणलेल नसत काही बरोबर नेता येत नाही इतकी दुर्दैवी नको बानूस की कोणाला क्षणभर सुख ही देता येत नाही देण्यात ही सुख आसते ईतके तरी समजावून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे काहीच आपल्या हातात नसत काहीच आपण करत नाही किती ही योजना आखल्या तरी तसे काही घडत नाही कश्याला विचार करतेस होईल तसे करून घे कोणावर तरी प्रेम कर आपला त्याला मानून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेसआता तरी हसून घे तुला काय वाट ते तूच सारे करत आसतेस नशिबात जे आसते तसेच सारे घडत असते मीळतय जे आत्ता तुलाते तर उपभोगून घे काळजी सोड नशिबवर स्वतावर हसून घे शहाणपण ठेव बाजूला मनप्रमाणे जगून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेसआता तरी हसून घे

Monday, July 6, 2009

......येशील सांजवेळी

साद देती सखे गं या सागरी लहरी
येशील सांजवेळी या सागरी किनारी ।।धृ।।

येती किती तरी गं या सागरा उभारे
केस कुरवाळताना उठती किती शहारे
बोल छपवू नको गं ओठांच्या तिजोरी ।।
......येशील सांजवेळी

क्षितिजावरी अभाळ धरेवरी झुकले
प्रेम या सागराचे किनारी धडकले
भेटीस साक्ष देईल चांदणे रुपेरी ।।
......येशील सांजवेळी

रेंगाळला इथे गं हा रेशमी समीर
जात्या क्षणासवे होतोय जीव अधीर
आहे तुझ्याचसाठी हा श्वासही अखेरी ।।
......येशील सांजवेळी

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आह

एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझे ते टपोरे घारे डोळे
व गुलाबासारखे गाल
तुझे ते ओठ नशिले
आणि मस्तानी चाल
फ़क्त माझ्याच या नजरेणे तुलाच बघायचे आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझा तो सुंदर चेहरा
जणू जास्वंदी सोबत मोगरा
तुझे ते सोणेरी रूप
जसे साखरेत मुरलेले तुप
त्यातल प्रत्येक स्वाद मलाच चाखायचा आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तुझे ते लांब रेशमी केस
हलकेच हवेत उडत
तुला झुल्यात बसवण्यासाठी
मन माझे तडपडत
त्या स्वप्नाच्या झुल्यात मला पण झुलायचे आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे

तु जवळून माझ्या जाताना
येत असे सुगंधी वारा
मनात माझ्या बरसे
जणू पावसाच्या धारा
त्या सुगंधी पावसात तुझ्याच बरोबर भिजायच आहे
एकदा का होईना मला तुझ्याशी प्रेम करायचय आहे
मनाच्या कळीलासुद्धा फ़ुलाप्रमाणे फ़ुलवायच आहे

अनामिका - मुलींच्या नावावर कविता...

कवितेला मी माध्यम बनवून
एकच अर्चना माझी जाणून
कोणासमोर आणू दर्शना
प्रकट करतोय माझी भावना.

प्रेरणा कुठे दिसत नाही
स्वप्नासाठी जगतोय
मीच माझी प्रतिमा पाहून
जगी स्नेहाची ओळख देतोय

रेशमाचे जुने नाते
अभिलाषा मनात आणते
आठवून ती निवेदिता
प्रचिती रसिका येते

प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे
कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे

कल्पना कल्पिता मानसी
चांदण्यात कृतिका हसली
संगीताशी इतकं नातं जुळलं
की सीमा सोडावी लागली

विणाने वेडं केलं
मैफिलीत शोभा आली
मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली

श्रद्धा आलो घेउन
ओढ़ लागली भक्तीची
मनात माझ्या पूजा ठेवून
वाट पाहिली आरतीची

अमृताचा शोध घेतांना
संजीवनी जीवनी आली
समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली

आधी विद्या मग किर्ती
निशानंतर उषा जाशी
आधी माया मग मोहिनी
छायानंतर ज्योति जशी..... छायानंतर ज्योति जशी...

हृदय फेकले तुझ्या दिशेने




हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर


मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

- संदीप खरे

हृदय फेकले तुझ्या दिशेने




हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर


मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

- संदीप खरे

बरं झालं



या जमिनीत

एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो . . .

चारदोन पावसाळे बरसून गेले

की रानातलं झाड बनून

परत एकदा बाहेर येईन . . .

म्हणजे मग माझ्या झाडावरच्या

पानापानांतून, देठादेठावर,

फांदीफांदीलाच मीच असेन . . .

येणारे जाणारे क्षण्भर थबकून,

सुस्कारत म्हणतील -

" बरं झालं हे झाड आलं !

अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आणि पानापानांतून माझे चेहरे

त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील . . .

माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर

माझं हसू आणि झुळूकश्वास

माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन . . .

त्यांच्या घामाचे ओघळ

माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -

" बरं झालं हे झाड आलं !

अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

माझ्या अंगाखांद्यांवर

आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं

आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील . . .

त्यांची वसंतांची गाणी

उडत माझ्या कानी येतील . . .

ती म्हणतील -

" बरं झालं हे झाड आलं . . .

नाहीतर सगळा रखरखाटच होता !

याच जागी आपल्या मागे लागलेला

तो वेडा कवी कुठे गेला ?"

मी पानं सळ्सळ्वत कुजबुजीन -

" बरं झालं मी झाड झालो . . .

वेडा कवी होण्यापेक्षा

आणखी काही वर्षांनी

मी सापडतच नसल्याचा शोध

कदाचित, कुणाला तरी लगेलही . . .

एखाद्या बेवारस, कुठल्याही

पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे

ते माझ्या नावाने अश्रु ढळतील . . .

माझी वेडी गाणी आठवत

कोणी दोन थेंब अधिक टाकेल . . .

आणी . . .

माझ्या चितेच्या लाकडांसाठी

माझ्याचभोवती गोळा होत

घाव टाकता टाकता ते म्हणतील -

" बरं झालं हे झाड इथे आलं

अगदीच लांब जाण्यापेक्षा . . ."

माझ्यावरती ' कोणी मी '

जळून राख बनताना

धूर सोडत म्हणेन -

" बरं झालं मी झाड झालो

अगदीच कुजून मरण्यापेक्षा . . . . . . . . . . . . "

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे


आपण . . . .



संदिप खरे यांच्या आणखीन कविता वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
आपण एखाद्यासाठी कोण असतो...
अधराचे शब्द ऐकत
"हा आपला" असे स्वत:लाच समजावत
रात्रभर उराशी बसणारा एखादा जिवलग....?
असं म्हणत-म्हणत डोळ्यातील बाहूल्यांशी
संवाद साधू बघणारे एखादे प्रौढ़ बालक....?

आपण एखाद्यासाठी कितपत असतो ?
एखाद्याच्या इछेभोवती पडलेच आपल्या नकाराचे कुंपण
तर स्मरणात राहतो का "जिवलग" शब्दाचा खोल अर्थ ?
का आपण असतो त्याच्यासाठी गोड गोड गाणारा बंदिस्त पक्षी...
जेव्हा जेव्हा चोच उघडेल तेव्हा तेव्हा मंजूळ आणि मंजूळच आवाज काढणारा ?

आपण एखाद्यासाठी कोण असू...?
पाखरांना पंख फुटतील, दिशा समजतील
आणि कळतील झाड़ सोडून जाण्याच्या आवश्यकता....
आपण असू जागा न सोडू शकणारे झाड़ !!!
भरारीच्या आवेगात पक्षी फिरकलाच कधी परत
तर त्याच्या आठवणीच्या दु:खाचे चोचले पूरवणारे झाड़ !

आपण एखाद्यासाठी कोण होतो....?
भेटलो नसतो असे कोणीतरी...?
आपण एखाद्यासाठी कोण असतो..?
ज्याच्यावाचून अड़त नाही असे आगंतुक सहावे बोट...?
आपण एखाद्यासाठी कोण असू...?
कधी लहर आलीच तर अश्रू पूरवणारे एखादे कारण...?
.........................
..........
आपण खुप करायचो अट्टाहास
पण आपण फार तर फार पाणी होऊ शकतो एखाद्यासाठी....
एखाद्याची तहान होऊ शकत नाही......

संदीपची नवीन उर्दू गझल - जुबाँ तो डरती है कहने से



जुबाँ तो डरती है कहने से

पर दिल जालीम कहता है

उसके दिल में मेरी जगह पर

और ही कोई रहता है ॥ धृ ॥

बात तो करता है वोह अब भी

बात कहाँ पर बनती है

आदत से मैं सुनती हूँ

वोह आदत से जो कहता है ॥ १ ॥

दिल-ओ-जेहन में उसके जाने

क्या कुछ चलता रहता है

बात बधाई की होती है

और वो आहें भरता है ॥ २ ॥

रात को वोह छुपकेसे उठकर

छतपर तारे गिनता है

सेज पे मेरी इक टुटासा

सपना सोया रहता है ॥ ३ ॥

दिलका क्या है,

भर जाये या उठ जाये,

एक ही बात...

जाने या अनजाने

शिशा टूटता है तो टूटता है ॥ ४ ॥



- संदीप खरे.

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो
व्याप नको मज कुठलाही अन् ताप नको आहे
उत्तर कुठले? मुळात मजला प्रश्न नको आहे
ह्या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो
आता आता छाती केवळ भीती साठवते
डोंगर बघता उंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखुष गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो
कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो


हा खडक काही केल्या पाझरत नाही



हा खडक काही केल्या पाझरत नाही
मी याला पहाटे गोंजारले आहे,
संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे,
रात्री माळरानावर नाचणार्‍या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे,
पण हा खडक काही केल्या पाझरत नाही.

उन्हाळ्यात हा तापतो,
थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार,
पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून
किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून
हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो
पण आत्ता हा खडक काही केल्या पाझरत नाही.

आता आता अजूनही मी या माळरानावर भटकायला येतो,
पण माझ्या सार्‍या गुराखी मित्रांबरोबर न रहाता
मोठ्या आशेने याच्या शेजारी येऊन बसतो
की.. हा खडक कधीतरी पाझरेल तेव्हा आपण तिथे असायला हवं.
मी माझी गाणी आवरून धरली आहेत;
मी आता पावाही वाजवत नाही;
किंवा पावलांनाही आता आतूनंच नाचावसं वाटत नाही;
या सार्‍यांच्यापार मला या खडकाविषयी उत्सुकता वाटू लागली आहे.
खडकाला माझ्याविषयी असे काहीच वाटत नाही
हे ज्या क्षणी लक्षात आले
तेव्हापासून मी असण्यापेक्षा खडक असणेच जास्तं चांगले असे वाटू लागले आहे.

मी खडक असतो तर मलाही असं
माझ्याविषयी उत्सुकता वाटणारा,
मी आतून पाझरायला हवे असे वाटणारा
कोणी "मी" भेटेल ?
माझे प्रश्न, वर निळे आकाश, खाली हिरवे गवत,
त्या गवतावरती मी, माझ्या शेजारी हा खडक.
हा खडक काही केल्या पाझरत नाही.

हे सारे कित्येक दिवस चालू आहे.
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
मला माझ्या आयुष्याचे सार्थक मिळाले आहे;
मला माझ्या आयुष्याचे प्रश्न समजले आहेत.
उत्तर नसलेल्या प्रश्नावर नजर रोखून त्राटक करताना...
आता आता जाणवत नाहीसे झाले आहे -
वारा, ऊन, थंडी, पाऊस;
भुलवत नाहीसे झाले आहे -
छंद, इच्छा, अपेक्षा, ओस;
खडक झाल्यासारखे वाटत आहे.

- संदीप खरे.

कसे सरतील सये



कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्‌यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

आता नाही बोलायाचे ... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ... विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झूले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरु झुरू दे ना
तेव्हा नाभा धरा सारी भिजवीला ना !!

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

"कसे सरतील सये" ह्या गाण्याची
गाण्यातलंच एक additional कडवं

.....कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोनं रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ... भरतील ना

"तारा तारा छेडलेल्या आणि बागा फुललेल्या
सुरावटी तुझ्या स्मरताना..
एक काटा रुतलेला आणि तारा तुटलेला
आठ्वांची माळ माळताना

धुक्यातून शोधताना,दवबिंदू मोजताना
वेडं माझं मोरपिस जपशील ना..."

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

चुकलेच माझे


मी कशाला जन्मलो? - चुकलेच माझे!
ह्या जगाशी भांडलो! - चुकलेच माझे!

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! - चुकलेच माझे!

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! - चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो - चुकलेच

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे!

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! - चुकलेच माझे!

वाट माझ्या चार शब्दांचीच होती..
मी न काही बोललो! - चुकलेच माझे!

Sunday, July 5, 2009

मी तरी देऊ किती आवाज आता..!


मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येइना अंदाज आता..!

हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!

यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!

प्रेम जे मुदलात होते, माफ केले
राहिले पण आठवांचे व्याज आता..!

पाहता तुज छाटले बाहूच दिसले.
ताज, मी पाहू कुठे मुमताज आता..!

– अभिजीत दाते

हसलो म्हणजे

'हसलो' म्हणजे 'सुखात आहे' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे 'दुखले नव्हते' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही ! ...

'हसलो' म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
'हसलो' कारण शक्यच नव्हते दुसरे काही
'डोळ्यामध्ये पाणी नव्हते' ऐसे नाही !

'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

'हसलो' कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
'हसलो' कारण तुलासुद्धाते खरे वाटते !
'हसलो' म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
'आतुन आलो होतो डवरून' ऐसे नाही..

'हसलो' कारण शास्त्राची मज ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
'हसलो' कारण हिशोबास या दमलो नाही
'हसलो' कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

'हसलो' कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
'हसलो' कारण सत्याची मज भीती नाही
'हसलो' कारण फसण्याच धसका नाही..

- नेणिवेची अक्षरे, संदीप खरे

वेळ झाली निघून जाण्याची




बोललो होतो कधी
ऐक ही माझी कहाणी
का तुझ्या डोळ्यांत आले
कारणावाचुनी पाणी

गज़लः

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची

नाव घे त्या तुझ्या दिवाण्याचे
काळजी घे जरा उखाण्याची

राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची

लोक आले आताच का आले
वेळ झाली निघून जाण्याची


-

हासण्याचा, खुळा प्रयास नको


हासण्याचा, खुळा प्रयास नक

हासण्याचा, खुळा प्रयास नको
आसवांना ,उगाच त्रास नको.......

मी जरी टाळले, वसंताला
ही फुलांची मिठी, कुणास नको?.......

चाललो मी, विराण देशाला
सोबतीला, तुझा सुवास नको.......

मृत्त्यू ,जामीन होऊनी यावा
जीवनाचा तुरुंगवास नको.......

तू चोर पावलांनी येऊ नकोस आता

तू चोर पावलांनी येऊ नको
तू चोर पावलांनी येऊ नकोस आता
स्वनांतल्या प्रमाणे ये राजरोस आता.....

आणू कुठून माझे मी पाय चालणारे
झालो उभ्या जगाचा मी पायपोस आता....

मागेच टाकला मी शेजार आठवांचा
मी हिंडतो मनाच्या गावात ओस आता.....

माझा तुझा घरोबा मृत्त्यो जुनाच आहे
होऊन हाडवैरी का वागतोस आता....

हारण्यास एक नवा, डाव पाहिज


सोडले कालच्या किनाऱ्याला
वादळे घेतली निवाऱ्याला
घेतले मी नवे पुन्हा फासे
हारण्याची नशा जुगाऱ्याला

गज़ल :-

हारण्यास एक नवा, डाव पाहिजे
साकळे जुना,नवीन घाव पाहिजे......

फत्तरास ही फुटू शकेल पालवी
आसवात तेव्हढा प्रभाव पाहिजे........

अंध:कार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे.....

दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी
त्यातही हसायचा सराव पाहिजे......


इतकी नाजुक इतकी आल्लड


इतकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ……. १
भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २
इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नाव
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक…………………..३
कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला …………४
इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो
टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक ………५
इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते…………..६
इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे
नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे ………7
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ……. १
भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २
इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नाव
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक…………………..३
कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला …………४
इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो
टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक ………५
इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते…………..६
इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे
नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे ………7

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही

मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

उशीरा उशीरा

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा
आयुष्य अवघे चुकामुक आहे, मला हे समजले उशीरा उशीरा

मला मागते ती दटावून आता, तिचे चित्र माझ्या खिशाआतले ते
तिने पहिले हे तिचे श्रेय नाही, जरा मी लपवले उशीरा उशीरा !!

जिवा गुंतवू पाहिले मी अवेळी, नको त्या स्थळी अन नको त्या प्रसंगी
तिला सर्व वेळीच लक्षात आले, मला फार कळले उशीरा उशीरा

अता प्राक्तनाचा उजाडेल तारा, किती जागुनी वाट मी पाहताहे
कधी ना कळे नीज लागून गेली, सितारे झळकले उशीरा उशीरा

किती पाहिली स्वप्न मी बेईमानी, अता खेदखंती कराव्या कशाला?
मला सत्य आधीच ठाऊक होते, पुरावे गवसले उशीरा उशीरा !

गड्या, जिंदगी हाय जमलीच नाही, तिला मी-मला ती उमगलीच नाही
जिण्याचा कधी पीळ गेलाच नाही जरी दोर जळले उशीरा उशीरा !!

- नेणीवांची अक्षरे, संदीप खरे

आता पुन्हा पाऊस येणार....



आता पुन्हा पाऊस येणार....
आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाष काळ नीळ होणार,
मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार, काय रे देवा.....
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,
मग ते कोणितरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतच कळल तर बर, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..
काय रे देवा.....
मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार्,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,
मग ते लतानी गायलेल असणार्...,
मग तूही नेमक आत्ता हेच गाण ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार्....
काय रे देवा.....
मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्....,
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्...,
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,
काय रे देवा.....
पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,
मग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार.....
काय रे देवा.....
पाउस गेल्यावर्शी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्शीही पडणार्....
काय रे देवा.....

भलती मागणी



गोड स्वप्नांची कहाणी
माझ्या ओठांशी खेळती
शब्द शब्दांतून गाणी
झुंजु मुंजु माझे हसू
सदाफ़ुलीची आरास
माझा सुगंध वाटते
कळी मोगर्‍याची वेणी
माझं मन झुळझुळ
झरा मधाळ गोडीचा
थेंब थेंबातून वसे
शिरशिरी झिणझिणी
विनापरांची मी परी
तनु माझि जलपरी
माझ्या तनुला जाळते
खुळे खळाळते पाणी
येशी अवेळीच असा
कसा रुसून बसशी
समजवू कसे तुला
तुझी भलती मागणी

- संदीप खरे

असं वाटत नाही



नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही

दु:खावर मी केली अश्शी मात,
हसता हसता दुखून आले दात,
आरसा म्हणतो हसणा-या बाळा, मी फसत नाही !

माझे जिणे भरभरलेले ढग,
पाण्याने या पोटी लागे रग,
देवाजी ची किमया हे पाणी कधी आटत नाही !

चालत रहाण्यासाठी जो हट्टी,
त्याची नेहमी खड्ड्यांशी गट्टी,
अस्सा मी प्रवासी त्याला गाव कधी भेटत नाही !

हाती येता कागद लिहीतो मी,
आपली आपण टाळी घेतो मी,
शब्दांनी या बेरड होता पान कधी फाटत नाही !

दुर्दैवाच्या दुर्दैवाते ते
माझ्या रूपे निर्लज्जा भेटे,
कानी देते धमक्या ते हजार मी बधत नाही !

हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही

- संदिप ख

वेड लागलं


दिसलीस वाऱ्यामध्ये आपुल्याच तोऱ्यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यामध्ये
वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
आता रण रण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
वेड लागलं आता वेड लागलं आता वेड लागलं
हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ कोण धरा झाडा नाही भान
जशी काही पाखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे येना माझ्या घरट्यात नीज आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं
पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा
वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
खुळावले घरदार खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली अगं अशी झणाणली काया
जीव असा खुळा त्याला विषाचीच माया आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यातून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उपराटी तऱ्हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा..हां वेड लागलं
वेड लागलं, हां वेड लागलं, वेड लागलं, आता वेड लागलं

- संदीप खरे

मन तळ्यात मळ्यात


मन तळ्यात मळ्यात...
जाईच्या कळ्यात...
मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्यात...

ऊरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कशात...

इथे वार्याला सांगतो गाणी
माझे राणी
आणि झुळुक तुझ्या मनात...

रात भिडू लागे अंगालागी
तुझ्या नखाची कोर नभात !...

माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्यात...

- मौनाची भाषांतरे, संदीप खरे

अल्बम - दिवस असे की
गायक - संदीप खरे व सलिल कुलकर्णी
संगीतकार - सलिल कुलकर्णी

कसे सरतील सये


कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्‌यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

आता नाही बोलायाचे ... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ... विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झूले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरु झुरू दे ना
तेव्हा नाभा धरा सारी भिजवीला ना !!

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

"कसे सरतील सये" ह्या गाण्याची
गाण्यातलंच एक additional कडवं

.....कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोनं रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ... भरतील ना

"तारा तारा छेडलेल्या आणि बागा फुललेल्या
सुरावटी तुझ्या स्मरताना..
एक काटा रुतलेला आणि तारा तुटलेला
आठ्वांची माळ माळताना

धुक्यातून शोधताना,दवबिंदू मोजताना
वेडं माझं मोरपिस जपशील ना..."

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

शपथ सुटली म्हण


शपथ सुटली म्हण!
गोष्ट फिटली म्हण!
मला ओळखू दे आधी
मग म्हणायचे ते म्हण!!

आभाळ भरलं आहे
वारा पडला आहे
आधी उपचार म्हणून मल्हार
मग मरवा म्हण!!

शिळेवर बसलो आहे
शिळेसारखा सारखा बसलो आहे!
शिळेवर गुणगुणतो जुनीच दुख्खे
तू काही नवीन म्हण!!

थोड़े म्हणायचे म्हण
थोड़े ना म्हणायचे म्हण!
गाणे संपताना तरी
सम गाठली म्हण!!

- मौनाची भाषांतरे, संदीप खरे

नसतेस घरी तू जेव्हा


नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन् चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो

एकाकी केविलवाणा
मी घरभर भिरभिर फिरतो
घुमघुमत्या आवाजाने
भिंतींना हाका देतो

तव मिठीत विरघळणार्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविन हृदय अडावे
मी तसा आकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

करु वाटे खरे तर तुला एक फोन


करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन

फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही
हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण

कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन !

खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन!
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले !
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भाडायला तरी सखे लागतात ना दोन !

- संदिप खरे

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी


मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

असेनही जरी


असेनही जरी मी सर्वांनी सोडलेला...!!!
असेनही जरी मी साम्प्रत्काली मोड्लेला...!!!
परुंतु इतुके निश्चित मजला ठाव की
मी इथला - पण नक्षत्रांशी जोडलेला...!!!!

हरकत नाही...


हरकत नाही...
"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी


मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी
तुला वाटले,ती भिरभिरते,तुला पहाण्यासाठी

म्हणून तू,जाहलीस माझी,माझी,केवळ माझी
किती बहाणे केले होते, तुला टाळण्यासाठी

घडीभराने मलूल होतो, गजरा वेणीमधला
खरेच सांगतो,खरेच घे हे,हृदय माळण्यासाठी

गुपचुप येऊन भेटत असतो, तुझी आठवण मला
तिचा दिलासा, मला पुरेसा आहे जगण्यासाठी

कधी कवडसा, बनुन यावे, तुझ्या घरी एकांती
उघडझाप करशील मुठीची, मला पकडण्यासाठी

तु म्हणजे ग, फ़ुल उमलते,गंध तुझा मी व्हावे
दवबिंदू, व्हावेसे वाटे, तुला स्पर्शिण्यासाठी

तुझी साधना करता करता,अखेर साधू झालो
निर्मोही झाला 'इलाही',तुला मिळविण्यासाठी

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही


काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही

ती केवळ सोबत होती


ती केवळ सोबत होती, सहवास म्हणालो नाही
गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही

तू वागलीस तो सारा व्यवहार जगाचा होता
अपराध कधीही माझा केलास म्हणालो नाही

राखेत निखार्‍यासम मी, धग आहे अजून बाकी
तव हाती आहे जगणे, वार्‍यास म्हणालो नाही

ऐकतो इथे भरलेला आहे बाजार व्यथेचा
मी विकेन तरिही माझ्या दुःखास म्हणालो नाही

खांद्यावर या विश्वाच्या परिघास कसे पेलू मी ?
ज्या रेषेवरती जगलो तिज व्यास म्हणालो नाही

श्वासांच्या घेउन कुबड्या आहेत सचेतन सारे
मी जीवन ऐसे नुसत्या जगण्यास म्हणालो नाही