Sunday, May 3, 2009

हासण्याचा, खुळा प्रयास नको




हासण्याचा, खुळा प्रयास नको
आसवांना ,उगाच त्रास नको.......

मी जरी टाळले, वसंताला
ही फुलांची मिठी, कुणास नको?.......

चाललो मी, विराण देशाला
सोबतीला, तुझा सुवास नको.......

मृत्त्यू ,जामीन होऊनी यावा
जीवनाचा तुरुंगवास नको........

No comments: