Sunday, May 3, 2009

ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली ना


ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली ना
ती याच अपेक्शेने
की असही होऊ शकेल
की झ-यातून नदी पर्यन्त,
नदीतून खाडीपर्यन्त
आणि खाडीतून समुद्रापर्यन्त जाऊ शकेल ही होडी !
कदाचित पूर्ण भिजणार नाही हिचा कागद
समुद्राशी पोहोचेपर्यन्त
आणि समुद्रातल्या तुफ़ान लाटानाही
लळा लावून तरन्गत राहील ही…
कडाडतील वीजा…लाटान्चे डोन्गर होतील
ख-याखु-या जहाजन्ची शिड

No comments: