उघड्या पापण्यांनी पाहू नकोस सजणे ...हळव्या काळजाला दावू नकोस सपणे !!चढते सावनाला धुंदी तुझी अनोखीटाळावेस यंदा तू पावसात भिजणे !!!राणी चांदण्यांना भरलेस का कपाळी ?नाही एवढ्यात बरे चांदणेच सरणे !!राधा गोपिकांच्या मेळ्यात क्रिष्न रमलाअमुच्या भाग्यरेखी आले सदैव झुरणे !!भगवंता सख्या रे आहे चराचरी तू ...याच्याहून आता कळणार काय 'असणे' ??वेडापीर आहे अंदाज हा 'अभी'चा मुश्किल न तरीही वेड्यास या समजणे !!उघड्या पापण्यांनी पाहू नकोस सजणे ...हळव्या काळजाला दावू नकोस सपणे !!
No comments:
Post a Comment