काही माणस जगत असतात मरणाच्या आशेने,थोडेच असतात वेडे जे चालत जातात सरळ मरणाच्या दिशेने.दगडाला वेदना टाकिचे घाव सोसतांना,त्या मूर्तीला यातना ह्या बडव्याना पोसताना.अहो वर्दिला दुखः नको त्याना सलामी,बंदुकी ढाळतात अश्रु नशिबी दहशतवादाची गुलामी.माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना,लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना.गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना,डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना.खादीला लाज वाटे ह्या नंग्याना झाकताना,खाकीचा उर फाटे त्या दंग्याना थोपताना.तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना.स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना.
No comments:
Post a Comment