लैला-मजनू, शिरी-फ़रहादसार्यांना मी वेड्यात काढणार आहेत्यांनी कबरी बांधल्या असतीलमी मात्र चैतन्यमंदिर बांधणार आहेस्वतःला कुणी सोमरसात बुडवलंमी प्रितीचा अमृतरस चाखणार आहेकितिकांनी जिवही दिला असेलमी त्याच प्रेमाखातर जगणार आहेप्रेम असफ़लच होतं नेहमीयालाच एक गैरसमज ठरवणार आहेकुणी माझ्यावर करावं की नाहीहे ज्याच्या त्याच्यावर सोडणार आहेकैकजण इतिहासजमा झालेतमी नक्कीच इतिहास घडवणार आहेत्याच्यापायी झुरणारे असतीलमी प्रत्यक्ष चंद्राला घरी आणणार आहेप्रेम पुरतं आंधळं असतं म्हणेमि तर त्यालाच डोळे बनवणार आहेत्यात आपसुक पडतात म्हणेमी घट्ट पाय रोवून उभा रहाणार आहेआजवर सार्या करुण कहाण्यामी माझी यशोगाथा लिहिणार आहेबहूदा सारे वेडे मजनू होतातमी मात्र अजिंक्य होणार आहे
No comments:
Post a Comment