न खरे तिचे ते बोलणे
नखरंगल्या बोटांसवे ती बरेच काही बोलतेनखरेल त्या डोळ्यांसवे न खरेच काही बोलतेती मेंदीच्या रंगातली रसना रसीली काहीशीदेहास लंपट रेशमी वसना नशीली काहीशीडोळ्यांतली परकी छटा होते अचानक नाहीशीझुळ्झूळत्या वस्त्रांतुनी ती बरेच काही बोलतेनखरेल त्या डोळ्यांसवे न खरेच काही बोलतेती चालताना नादते झंकारणारे चांदणेती हासते तेव्हा कुठे होते कळ्यांचे उमलणेत्या गौर चंदन कांतीचे ते शांत शीतल शोभणेकिणकिणत ते पैंजण तिचे सारेच काही बोलतेनखरेल त्या डोळ्यांसवे न खरेच काही बोलतेमानेवरी रुळती तिचे ते केस कुरळे काजळीथरकाप होतो या जीवाचा सुगंध येता वादळीछातीवरी रुळते ती सुंदर सोनसरी गं साखळीती बिंदी त्या चमकीस बघ हलकेच काही बोलतेनखरेल त्या डोळ्यांसवे न खरेच काही बोलते
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment