क्षणभंगुर जीवनात स्वार्थ फार लहान आहे.त्याचा त्याग केला तर अर्थ खरंच महान आहे.उमलणा-या प्रत्येक कळीचा कोमलपणा तितकाच सोज्वळ आहे.फुल कुठे उमलले, त्यामुळे का त्याचे अस्तित्व बदलणार आहे?गुलाबाच्या मळ्यातले आणि ओसाड रानातले गवताचे फुल, एकच असणार आहे.मग का त्याचे अस्तित्व, रानात राजाप्रमाणे आणि मळ्यात नसल्यात जमा असणार आहे?जीवन जाळ्यात योग्य वाट निवडणे महत्वाचे आहेउन्नतीची निवडली तर ठीक, नाही तर सगळच 'GONE' आहे.म्हणुन, पाण्याच्या थेंबानेकुठे पडावे हे जाणणे गरजेचे आहेकारण, तव्यावर पडला तर तो संपणार आणि शिंपल्यात त्याचा मोती होणार आहे.लावलेली प्रत्येक मेणबत्ती एक दिवस विझणार आहे.तिने दुसरीला प्रज्वलित केले तरच, तिचा प्रकाश तेवत राहणार आहेम्हणुन दुस-यांसाठी जगणेच जीवनाची गोळा बेरीज वाढवणार आहेकारण तीच गोष्ट फ़क्त, एकाचवेळी दोन जीवन जगल्याचा आनंद देणार आहे.सुखाच्या सावलीत दू:खाचा कवडसा असणार आहे.तुम्ही त्यात कसे विसावतात यातच तुमचे सामर्थ्य दिसणार आहे.कुठलंही काम मनापासून करणे फायद्याचे ठरणार आहेकारण, हर्षोल्हासाने केलेली कुठलीही गोष्ट सिद्धीस जाणार आहे.
No comments:
Post a Comment