हा काय न्याय झाला??।प्रारब्ध तिचं..फ़ुटकं नशीब तिचंललाटीच्या दुर्दैवाचं प्राक्तन देखील तिचंचआकंठ रक्तबंबाळ शरीर गात्रं मात्र माझंहा काय न्याय झाला??आवेग तिचा, कळवळणं तिचंजलबिन माश्याचं तडफ़डणं देखील तिचंचरात्रभर निद्रानाशाने तळमळणं मात्र माझंहा काय न्याय झाला??आरक्त डोळे तिचे,वेदना तिच्याअसहायतेने अनावर रडणं देखील तिचंचअसह्यतेने कळ उठणारं हृदय मात्र माझंहा काय न्याय झाला??खरा न्याय तेव्हा झाला असता जेव्हाप्रारब्ध तिचं.. फ़ुटकं नशीब तिचंमाझ्या आकंठ रक्तबंबाळ शरीर-गात्राबरोबरतिच्या ललाटीच्या दुर्दैवाचं प्राक्तन देखील माझं असतंखरा न्याय तेव्हा झाला असता जेव्हाआवेग तिचा, कळवळणं तिचंमाझ्या रात्रभर निद्रानाश तडफ़ण्याबरोबरतिचं जलबिन माश्याचं तडफ़डणं देखील माझं असतंखरा न्याय तेव्हा झाला असता जेव्हाआरक्त डोळे तिचे,वेदना तिच्यामाझ्या असह्य कळ उठणारऱ्या हृदयाबरोबरतिचं असहायतेने अनावर रडणं देखील माझं असतंखरा न्याय तेव्हा झाला असता जेव्हाहरेक हसू तिचं, हरेक रडू माझंतिला मिळणाऱ्या हरेक सुखं आनंदाबरोबरतिचं हरेक दुःख वेदना सारं सारं केवळ माझं असतं ----------
No comments:
Post a Comment