अशाच एका संध्याकाली, मन खुप जास्तंच उदास झालं होतं......काय करू? काहीच सुचत नव्हतं........ उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात..........गेलो मग स्मशानात एकटाच............! बसलो एका थडग्याजवळ जाऊन...थडगे ताजे वाटत होते... मनात कुतुहुल जागले... थडग्यावरचे नाव वाचले...'महनाज खान' '१९८६-२००७ '....म्हणजे माझ्याच वयाची असेल.कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला? काय कारण असेल? आजार? खून? का....का बाळतपणात दगावाली असेल ती? मनात उगाच प्रश्नांचे काहुर उठले....तेवढ्यात एक मुलगा तय थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला..मी त्याला विचारले 'तू भाऊ का तिचा? '...... तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!!' मी विचारले 'आत्महत्येचे कारण?' तो म्हणाला 'मला ब्लड कैन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फ़क्त!!' मी चकित झालो. विचारले 'मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?' तो म्हणाला 'ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे !!!!'..मी निशब्द...........असंही प्रेम असतं!!!! हेच ते शब्द जे मनाला भिडतात, मनात खोलवर रुतुन बसतात... जुन्या आठवणींना उजाळ देतात.... अन.. आयुष्यातले सारेच पावसाळे डोळ्यासमोर उभे करतात!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment