भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाचीधुंद वादळाची होती, रात्र पावसाची ॥ध्रु॥कुठे दीवा नव्हता, गगनी एकही ना ताराआंधळ्या तमातुन वाहे , आंधळाच वारातुला मुळी नव्हती बाधा, भीतीच्या वीषाची ॥१॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....क्षुद्र लौकीकची खोटी झुगारुन नीतीनांव्गांव टाकुन आली अशी तुझी प्रीतीतुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ॥२॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....केस चींब ओले होते, थेंब तुझ्या गालीओठांवर माझ्या त्याची कीती फुले झालीश्वासांनी लीहीली गाथा प्रीतीच्या रसाची ॥३॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वासस्वप्नांतच स्वप्न दीसावें तसे सर्व भाससुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाचीभेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाचीधुंद वादळाची होती, रात्र पावसाची
No comments:
Post a Comment