मन हे वेडे , गुंतत राहातेस्वप्न बिलोरी गुंफत राहातेठाउक नसते त्याला तेंव्हा ...प्रारब्धाचे खेळ अकल्पित ...धरु पाहता .... निसटुन जाते मन हे पक्षी ... विहरत राहातेनवी क्षितिजे शोधत राहातेठाउक नसते त्याला तेंव्हा ...सप्तरंगी हे आकाश भुलवून ....घरट्यापासून दूर नेते .... पण मन आशावादी , झुंजत राहतेक्रूर नियतीला थकवत राहाते ...ठाउक ' असते ' त्याला तेंव्हाअसला जरी अंधार कितीही ....प्रकाशाशीच त्याचे नाते
No comments:
Post a Comment