Saturday, November 1, 2008

जोडीदार

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!एक मेकांना दिलेल्या दुःखांवरएक मेकांसोबत घालवलेल्या अनेकआनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी..आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!अनेक जुन्या आठवणींनी आणलेलेएक मेकांच्या डोळ्यातीलआनंदाश्रु पुसण्यासाठी.....आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!आयुष्यात पुढे येणारया अनेकदुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्याहातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणातएक मेकांचा हात धरण्यासाठी,एक मेकाला सावरण्यासाठी.......

हसण्यात खरी मजा आहे

.असेच बसण्यात सजा आहे, हसण्यात खरी मजा आहे.रोज हसत-खेळत रहावे, मित्रांनी लिहिलेले विनोद रोज वाचावे.असेच बसण्यात सजा आहे, हसण्यात खरी मजा आहे.आपले विनोद दुसऱ्याला द्यावे, त्याचे विनोद आपण घ्यावे,असेच बसण्यात सजा आहे, हसण्यात खरी मजा आहे.

मी कशी आहे ?

कधी मी वारयाची झुलूक असतेतर कधी बेफाम वारा असतेकधी मी पावसाची हलकी सर असतेतर कधी समुद्रची लाट असतेकधी मी डोलनारे कणिस असतेतर कधी खम्बिर तरु असतेकधी मी शांत नदी असतेतर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असतेमी तो सुर आहेजो मनाला दिलासा देतो,तर कधी हुरहुर लावतोबस आणि काय सांगूसगलच लिहिता येत नाहीम्हनून म्हणतेमी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही......

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीलापैशात भावनेचा व्यापार पाहीला मीअंधार वेदनांनी आक्रंदतो तरीहीनजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मीरस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतूवस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहीला मीथोडा उजेड ज्याला मागावयास गेलोतो सूर्य ही जरासा लाचार पाहीला मी

----- माझ्या काही चारोळ्या ----

शब्द तुझे , शब्द माझे ,वाचू आपण बेधुंद ,बघ माझ्या मिठीत येउन लागेल तुला माझाच छंद ..... ----------------------------तुझी आठवन आली अन शब्द मुके झालेरात्रीच्या चांदण्यातहीमन वेडेपिसे झाले ---------------------रात्रि गोड चांदण्यात मला तू दिसत होती माझ्या पेक्षा वेगळी असुनही माझीच वाटत होती
----------------------------
तू असे म्हणतेस की तू प्रमाणिक जागतेय माझे मान चोरूनही आणखी काय मागतेय -------------------------

एक प्रश्न ...


एक प्रश्न ...मन म्हणजे पाउस ..का पाउस म्हणजे मन ?पण हे मात्र नक्की मी म्हणजे तू का तू म्हणजे मी ?हे माहित नाही ...पण हे मात्र नक्की पावसासोबत तू असली मी माझा नसतो भिजलेला मी.. काभिजलेले मन ?पण हे मात्र नक्की तू जवळ नसतानापाउस एकाकी वाटतो त्याची साथ द्यायला मग मी ही जातो तुझ्याच आठवणिनि आम्ही व्याकुळ होउन धावतो पावसाचे थेंब..का डोळ्यातील आसवे ?पण हे मात्र नक्की मी आणि पाउस फक्त तुलाच शोधतोय आसवांच्या पुरात ...का आठवनींच्या थेम्बात ?पण हे मात्र नक्की एक प्रश्न ...मन म्हणजे पाउस ..का पाउस म्हणजे मन ?

कोडे ....

सर्वात सुंदर काय ... ?मैत्रीतले मन ..का ..मनातली मैत्री ? मनात असते तुझीच मैत्री का ....तुझ्याच मैत्रीत मन ?कोडे........मनातील तुझे विचार का .....तुझ्या विचारांनी भरलेले मन ?कोडे .....विचारां मधे फ़क्त तू का ....तू म्हणजे फ़क्त विचार ?कोडे .....तू म्हणजे मन का .....तू म्हणजे मैत्री ?कोडे.....तू म्हणजे प्रेम का प्रेम म्हणजे तुझी मैत्री ? कोडे.....

"वेडीच आहेस "

तुला कसं गं काहीच कळत नाही ....येथे जाळणारे बरेच आहेतपण कोणीच स्वतः जळत नाही !!!ज्याचा घाव न् घाव,ठेवला आहेस काळजात जपूनत्याचा मात्र तुझ्यासाठीएकही अश्रू ढळत नाही ...वेडीच आहेसतुला कसं गं काहीच ठाऊक नाही ??हे जगच पारध्यांचेयेथे कोणीच भाऊक नाही !!!!समजून घ्यावी कोणीतुझ्या काळजातली कळ ?तुझ्या सारखी कोणाचीहीवेदना घाऊक नाही !!वेडीच आहेसकशी गं त्याला 'विसरत' म्हणून नाहीअजूनही त्याच्या शिवायदुसरी 'हसरत' म्हणून नाही ...एकांतात आसवांशीसारखं हितगूज करतेस म्हणे !लोकांसमोर मात्रअश्रुंचा तोल घसरत म्हणून नाही !!वेडीच आहेसअजूनही स्वतःलाच दोष देते .रेशीम वेळी मनालाआठवांचा कोष देते !!साळसूद पणे निघून जाणार्याचीअडचण असेन काही .....असे समजूनघटके पुरता मनास तोष देते !!!वेडीच आहेसआता तरी उघड्या डोळ्यांनी जग बघ ...आयुष्या वर ओढवून घेतलेलेविरहाचे ढग बघ !!!तू ही सगळ्यांसारखी'Practical' होऊ शकतेस ...एकदा तरी तुझ्यामधलीआजमावून रग बघ !!!एकदा तरी तुझ्यामधलीआजमावून रग बघ !!!

"मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा "


मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!एक एक दिस वाटे वर्ष वर्ष साजणीमी कसे जगायचे सांग ना तुझ्याविणा ??भले आजही तुला जिवंत मी दिसेनही मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!! "

" स्वप्नातली परी "

वेदना कोणती तरी होती ....तू दिलेली दवा बरी होती !!भेटली ना मने तुझी माझीभोवती आडवी दरी होती !!हासतो आजही जरी खोटा ....कालची आसवे खरी होती !!नाव घेतेस का कधी माझे ?ुतू तशी फार लाजरी होती !!सोडुनी का उदास माहेरा ?हाय तू दूर सासरी होती !!हात मागू नवा कशासाठी ?जिन्दगानीच आखरी होती !!!बोललो ना जरी कधी तेंव्हातूच 'स्वप्नातली परी' होती !!!

" ऐनवेळी मला दूर सारू नको ..."


ऐनवेळी मला दूर सारू नको ...घे उखाणा व्रुथा वेळ मारू नको !!लाघवी वेदनाण्चे शहारे बरेहुस्न पाहून मित्रा शहारू नको !!थेट माझा गळा काप केंव्हातरी गोड बोलून तू वीष चारू नको !!डाग असल्यावरी चंद्र सुंदर कसा ?प्रश्न हा लाजमी पण् विचारू नको !!स्वप्न हद्दीत बघ आज वेड्या मनास्वप्न मोठी सख्या तू पाहू नको ....अम्रुताचा सडा टाक ओठावरीमज पिढीजात अधरात दारू नको !!!

"सांग माझी कहाणी कधी !"

सांग माझी कहाणी कधीजाळलेली जवानी कधी ....वाहलो आसवांणीच त्यालाट आली तुफानी कधी ?!शोधले मी तुला खुपदादाविली तू निशाणी कधी ...?जाणले रे मना मी अताती नसावी 'दिवाणी' कधी !!पेटली भावनांची 'चिता'नेमकी ह्या ठिकाणी कधी ??देखण्या वेदनांची 'अभी'वाच 'यादी' पुराणी कधी !!

"दूर पाऊस कोसळून गेला"


दूर पाऊस कोसळून गेलादवांना ललाटी तुझ्या आसरा ...काळ्या विवरात विरले मेघसुर्य ढळता कुणाचे वेध ..ऊर आतुन पोखरुन गेला !दूर पाऊस कोसळून गेला !!निळ्या अंबराला कळेना कधीधुंद पवना कळेना ही भाषा ..सूर शोधून सुचवून गेला !!!दूर पाऊस कोसळून गेला !माझ्या पावसाला विचारा तरी कधी तो बरसेल वेड्याच्या दारी ??चिर कोरुन ह्रिदयात गेला ..!!दूर पाऊस कोसळून गेला !दवांना ललाटी तुझ्या आसरा ...दूर पाऊस कोसळून गेला !

"मी ऐकलंय"

की माझी पत्रे आणि ग्रींटींग जाळतांना तुझा हात थरथरत होता म्हणून ...........मी ऐकलंयकी तो तुला मंगळसूत्र बांधतांनातुझा जीव तळमळत होता म्हणून !!!मी ऐकलंयकी ऊखाणा घेण्यापुर्वी तू दिर्घ श्वास घेतलास म्हणून ...........मी ऐकलंयत्याने तुला स्पर्श करण्यापुर्वीतू डोळे गच्च मिटलेस म्हणून् ...मी ऐकलंयकी त्याला तू भारी पसंत पडलीस म्हणून ...........मी ऐकलंयकी साखर पूडा होताचतू रड रड रडलीस म्हणून .......मी ऐकलंयकी तुझ्या मैत्रीणी म्हणाल्याअभी 'पळपूटा' निघाला म्हणून .......मी ऐकलंयकी सर्वांचे म्हणणे ऐकून देखीलतू मला दोष नाही दिला म्हणून .....मी ऐकलंयकी तू प्रामानिक पणे त्याला माझ्या विषयी सांगितले होतेस म्हणून .....मी ऐकलंयकी मुलगा झाल्यास नाव अभी ठेवायचेहे वचन तू त्याला मागितले होतेस म्हणून !!!मी ऐकलंयकी गेल्या तीन वर्षांत परिस्थिती जरा बदलली म्हणून ....मी ऐकलंयकी तू ही आता त्या धक्क्यातून थोडीफार सावरली म्हणून .....मी ऐकलंयकी कोनितरी परत एकदा म्हटले "जाऊ दे! अभी सुद्दा निघाला मुलगा तसला म्हणून !!"पण तू हे ऐकलस काकी एवढ्यातच माझाआत्महत्येचाप्रयत्न फसला म्हणून ??????

"हळव्या काळजाला"

उघड्या पापण्यांनी पाहू नकोस सजणे ...हळव्या काळजाला दावू नकोस सपणे !!चढते सावनाला धुंदी तुझी अनोखीटाळावेस यंदा तू पावसात भिजणे !!!राणी चांदण्यांना भरलेस का कपाळी ?नाही एवढ्यात बरे चांदणेच सरणे !!राधा गोपिकांच्या मेळ्यात क्रिष्न रमलाअमुच्या भाग्यरेखी आले सदैव झुरणे !!भगवंता सख्या रे आहे चराचरी तू ...याच्याहून आता कळणार काय 'असणे' ??वेडापीर आहे अंदाज हा 'अभी'चा मुश्किल न तरीही वेड्यास या समजणे !!उघड्या पापण्यांनी पाहू नकोस सजणे ...हळव्या काळजाला दावू नकोस सपणे !!

प्रेमात मी अजूनी झालो कुठे शहाणा?"

**************************मला वेड लागलंयहा दावाच तकलादू आहेमी वेड्यासारखा वागतोय ही तर प्रेमाची जादू आहे!**************************प्रेमात मी अजूनी झालो कुठे शहाणा ?स्वप्नांत राहणारा मी जाहलो दिवाना !!झालेत मग्न सारे आपापल्या सुखांशी .....सांगू तरी कुणाला इश्कातला तराणा ?!टाळी कधीच एका हाती न वाजली रेप्रेमात हाच यावा तजुर्बा जुनापुराना !!!ती राहते जिथे ती धरती सुपीक व्हावीमाझ्या ललाटरेषी यावा तिचा विराणा.व्याकूळ जीव झाला यावेस तू समोरीचंद्रा अमावसेचा आता पुरे बहाणा !!!स्वप्नातल्या परीचे ठाऊक नाव नाहीअंदाज बांधुनी मी घेऊ कसा उखाणा ??

"तू भिजूही नको एवढी साजणी!"


"पावसा रे किती आसवे मागतोमी किती द्यायचे का असे वागतो .....?मेघ पेंगायला लागले सावनाचंद्र मेघांतला का तरी जागतो ??काळजाची व्यथा बोललो ना कुणाथेंब होऊन ये मी तुला सांगतो !!!पावसाच्या सरी कोसळू लागतामी कशाला तुझ्या भोवती रांगतो ?तू भिजूही नको एवढी साजणीतोल माझा गडे बघ ढळू लागतो !!!"

मैत्री काय आसते


मैत्री ही समुद्रा किनारा आसतेती कधीही एकमेकाची साथ सोडत नाहीआणि एकमेका पासून राहू शकत नाही !! १ !!मैत्री ही फुलाच्या कळीसारखी आसतेती स्व:त उमलत राहतेआणि इतरानाही आसच उमलत रहायला सांगते !! २ !!मैत्री ही सूर्यासारखी आसतेती स्व:त ही तेजस्वी आसतेआणि इतरानाही तेजेस्वी रहायला शिकवते !! ३ !!मैत्री ही समईतल्या वातेसारखी आसतेती स्व:त जळून इतराना प्रकाश देतेआणि इतरानाही तसाच प्रकाश द्यायला शिकवते !! ४ !!मैत्री ही पाण्यासारखी आसतेती स्व:त सारखे सर्वाना निर्मळ रहायला शिकवते !! ५ !!

मैत्री


मैत्री ही एक समूद्राला जोड़नाऱ्या दोन किनाऱ्यासारखी आसतेती कधी ही तुटू शकत नाही ..... मैत्री ही एक गुंतलेल्या धाग्यासारखी आसतेतिला कितीही अलग करायला गेल तरी ती जास्तच गुंतत जाते पण तुटत नाही .... मैत्री ही ताऱ्यासारखी आसतेतिला विसरली तरी ती आठवणीच्या रुपात भेटते .... मैत्री ही निसर्गासारखी आसतेती सगळ्याबरोबर सतत निर्मळ आणि स्वच्छ सुधंर आस नात टिकवायला शिकवते .... मैत्री ही फुलासारखी आसतेती सगळ्याना सुगंधी सुवासाप्रमाने मैत्री करायला शिकवते ......

आई


आई म्हणजे मायेच माहेर , ममतेच मंदिरप्रेमान भरलेला जणू तो समुद्रचआई बरोबर आसते तेव्हातिची कोठभर पण माया आपल्यला आभाळाएवढी वाटतेपाची पकवानाने बनवलेल्या जेवानापेक्षातिच्या हाताने बनवलेल्या झुणका भाकरीची चवच न्यारीझुणका भाकरी कशी पण आसू देत पणती ज्या मायेच्या हाताने भरवतेत्या हाताची रंगतच प्यारीपण तिला सोडून आता दुसरीकडे राहाव लागतआणि दुसर्याच्या आईकडे बगून स्वप्नात हरवाव लागततिने चारलेल्या त्या हाताची आठवन झाली तर मात्रडोळ्यातून अश्रुना आमत्रण द्याव लागत

असा कसा हा पावसाळा


हा थंड असा शीतल गारवाही पावसाची कोवळी सरजणू काही घेवून येतात सगळे अभाळ अंगावरअसा हा पावसाळा !! १ !!ही सर येताच आसे वाटेजणू काही समुद्र धकलते अंगावरकिती मधुर क्षण हा हळवाअसा हा पावसाळा !! २ !!त्या सोबत पडती त्या घाराआसे वाठे सारे चांदने ओतती दाराअसा हा पावसाळा !! ३ !!असाच हा पावसाळा लहानाच्या मोजमजेचापण मोठाच्या धग धगेचालहानाची मजा आणि मोटयाची होते सजाअसा हा पावसाळा !! ४ !!

माझ बालपण


माझ बालपन कास सांगू तो कठा, ती खेळायची पडकी जागा, ती लपाछपीची भींत, तो शिवाशिविचा खांब... हीच ओळख त्या चिमुकल्या गावातल्या चिमुकल्या मुलाची हेच माझ बालपण !!१!! त्या पावसातिल भिजन ,त्यामधेच गोट्या खेळण, आणि रात्री ताप आला की झोपेतच दिवसभरच सर्व बोलण बडबडन हेच माझ बालपन !! २ !! शाळेला जायची तयारी , त्यात अभ्यास अर्धा असलेला ती तेवढीच भीती , खायला लागायचा गुरूजी कडून मार पण कधी हरलो नाही अभ्यासात माग पार हेच माझ बालपण !! ३ !! खर अस कस असत हे बालपण जणू एक जिवनातील आलड आणि करमनुकीच वय देवा मला परत बालपण मिळेल का ? नाही मित्रा ते एका वेळीच मिळत असेच माझे विचार आणि असेच माझे बालपण !! ४ !!

माझ मन हरवल ह्या कवितेत


कुणीतरी असावेगालातल्या गालात हसणारभरलेच डोळे कधी तर ओल आसवाना पुसणार !कुणीतरी असावेपैलतिरी साद घालणारेशब्दाना कानात साठवून गोड प्रतिसाद देणारे !कुणीतरी असावेचादंन्याच्या बरोबर नेणारअंधारलेल्या वाटेत आपल्या सोबत येणार !कुणीतरी असावेफुलासारख फुलणारफूलता फूलता सुगंध दरवळणार !कुणीतरी असावेआपल्या मनात रमणारपालिकडील किनार्यावरून आपली वाट पहणार ! कवी कोण माहित नाही

आठवण

हीच ती आठवण त्या दिवसाचीजिथे मी घेतली होती प्रेमाची शपथजिथे तू दिली होती जीवनातशेवटपर्यंत सोबत रहायची वचने !! १ !!हीच ती आठवण त्या दिवसाचीजिथे झालो आपण दोघही प्रेमीजिथे घेतल्या आपण जीवनभरएकत्र जागायच्या आनी !! २ !!तू विसरली आसशीलपण तू माझा विचार केलिस का?तोच तो ज्याला आपण दिलेलीवचने पूर्ण केलि नाही !!३ !!त्याच आठवणीमी एक एक करून कागदावर उतरवत आहेतुझ्यासारखे कोणी चुकूनये म्हणूनत्यानाही हा सल्ला देत आहे !! ४ !!

अस कस हे मन


समुद्रातून येणाऱ्या लाटेसारखसकाळी पडणाऱ्या दवासारखआळवावरील पाण्याच्या थेंबासारखअस आसत हे मन !! १ !!एकाला जीवापलिकडे जपणारएकाला मनापासून मागणारएकावर जीवापलिकडे इच्छा करणारअस आसत हे मन !! २ !!पडणाऱ्या सावळी सारखचमकणाऱ्या चांदण्यासारखयेणाऱ्या झुळुक वाऱ्या सारखअस आसत हे मन !! ३ !!खरोखर मन हे किती हळव आसतयेतील ती स्वप्न रंगवणारआणि त्या स्वप्नात बुडून जाणार हे वेड मन !! ४ !!

मैत्री कशी करायची आसते ?

एकदा मैत्रीचा हात पुढे केला कीतो शेवट पर्यंत मागे घ्यायचा नसतोएकदा शब्द दिला कीतो शेवट पर्यंत मागे घ्यायचा नसतोमैत्री अशी करायची आसते............चार दिवस मैत्री करायची आणिनंतर विसरून जायच नसतएकदा आपल्याबरोबर जीवापलीकडेमैत्री करत आसेल तर त्याला दुःखवायच नसतमैत्री अशी करायची आसते............

ह्याच माझ्या आठवनी

माझ्या जीवनात तू फुल बनून आलीस जस फुल कोमेजत तस तू कोमेजुण गेलीस पण हे वेड माझ मन ते फुल आजून ताजच आहे आस समजुन आजून श्वास घेत !! १ !!तुला कदाचित समजल नसेल एकाद्याला आर्ध्यावर सोडून द्यायच नसत पण मी इकडे जगुन ........ मेल्यासारख जगतो आहे !! २ !!तू कदाचित ते दिवस विसरली आसशील पण मी त्याच दिवसतिल एक एक क्षण आठवून एक एक कविता लिहितो आहे !! ३

!! नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!

तुझ हसन आणि माझ फसन कस एकाच वेळी घडल हे माझ वेड मन नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!१!!
पुनवेच्या त्या मंद प्रकाशात चेहरा तुझा दिसावा त्यावर चंद्राचा प्रकाश पडावा पडलेल्या खळीमधून तो उठून दिसावा हे कस एकाच वेळी घडल नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!२!!
वाऱ्याचा एक झोका यावा आलेल्या वाऱ्यान केस तुझे फुलावेत त्यातील एक केस माझ्या चेहऱ्यावर यावा आलेल्या केसान मन माझे जिंकाव हे कस एकाच वेळी घडल नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!३!!
पावसाची एक सर यावी आलेल्या त्या पावसाच्या सरित आम्ही दोघानी चिंब भिजाव तश्याच त्या पावसात मी तुला उचलून घ्याव हे कस एकाच वेळी घडल नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!४!!
तुझ्याच विचारत स्वप्नात हरवाव त्यात तुझा चेहरा समोर यावा तू त्यात गोड लाजाव हे कस एकाच वेळी घडल नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडल !!५!!

खुप कही मला बोलायाचे आहे

खुप कही मला बोलायाचे आहे ,पण आता मी बोलणार नाही .काळजतले दु:ख कुणाला आता सांगणार नाही.लोक इतके शहाने आजचे की ,उद्या त्यावर माझा हक्क ठेवणार नाही.मी गाइल माझे गाणे आज ज्यांचा समोर उद्या तीच लोक माझे सुरांशी नाते ठेवणार नाही .मी आता कोणाशी बोलणार नाही .गुपीत तीचे नी माझे कोणाला सांगणार नाही.डोळ्यात तीच्या पानी आता खुठे दाटूनयेणार नाही ?ती दूर कुठे गेली इथेच माझ्या हृदयात ठान मांडून आहे .मी बोलतो रोज तीच्याशी एकांत रात्री ,चांदण्या असतात संगतीला .रोज नवी आठवण आमच्या दोघांच्या पंगतीला,मी आता काही बोलणार नाही गुपीत आमचे आता खोलणार नाहीती येते रोज रात्री मला भेटायला नदीच्या कीनारी,गुपीत तीचे पाण्याला मी सांगणार नाही .ती असते फुलांच्या सवे बागेत मज संगे पन्भोवार्यना समोर मी तीला आता भेटणार नाही. तीने घेतलेली शपत ती मोडून गेली पण मी माझे वचन मोडणार नाही .मनातले माझ्या मी ,मी कुणाला आता सांगणार नाही.तीने दीलाय होकार मी मलाही सांगणार नाही.लोक इथले इतके शहाने की त्यावरही गुपचुप बोलायची संधी सोडणार नाही.काल परयंत ती होती फक्त माझी मैत्रीण ,आज झाली जीवाची सखी हे गुपीत मी पाळ्नार आहे .आजुन खुप तीच्या संगे बोलायाचे आहे .पण आता बोलणार नाही .डोळ्यांची भाषया मी तीच्या कडून शीकनार आहे .दोघांचा करार कालचा मी पाळ्नार आहे .

आठवानीची पान चाळतांना


आठवानीची पान चाळतांना तुझेही एक पान हाती लागते .....अन मग मन वेड्या गत वागते .भवीष्य समोर सोबत वतर्माना तरी भुत्काळात ओढला जातो .सार काही आठवते मग जे कधी वीसरायाच ठरवल होतं....मन मग त्या सगळ्या ठीकाणी फीरून येत जीथं कधी आपल भेटणं होत ....आन सर कही आठवत ...डोळ्यात सगळ आभाळ साठवत ....जागा होतो तो कोनान कोना,...............................................................ठाउक आहे आज तुझं येण शक्य नाही तरी तुझ्या भेटी साठी आतुर होतो ,का कसा कुणास ठाउक कसा कातर वेळेला फीतुर होतो .तू गेलीस ज्या वाटेवर मला सोडून ...तीचा शी तीजा पर्यंत मी शोध घेतो ..ठाउक असत तुझ परत येन नाही ..तरी मन तुझीच वाट बघत ...रोज सूर्य मवालेपरयंत ते भटकत असते .रात्र झाल्यावर तुझ्या आठव्नीत जागत

ये अशी तू सजनी

ये अशी तू सजनीरात्र थोडी सरल्यावर,नभी तारका क्षितिजा वरच्याथोड्या मागे उराल्यावर .सावरग पदर तुझातो वा-यावर झुलतो आहे .सावकाश तू चाल हरिणीपायी काळोख तुझ्या ग फुल्लातो आहे .पदराला सावरीत येपावलांना आवरीत ये .आत्ताच झोपलेत वेडे तुझे...स्वप्न तयान्न्चे खुलवित ये .अबोलिच्या माझ्या फुलाना फुलवित ये .थांब थोडी माघारी जाण्याची नकोस करू तू घाईखट्याळ असे हां चंचल वारा ह्याला थोड थकू देनभीच चांदन थोड अजुन जरासं झुकू देरात्र सारी बाकी अजूनतिला थोडी तुझ्यासोबत सरू देनक्षत्राना तुझ्या माझ्या ह्या घेउनतुझ्या कुशीत मला थोड शिरू देये अशी तू रात्र थोड़ी सरल्यावरतुझ्या अंगनात काळोख थोडा भरल्यावरये अशी तू सजनीनभी तारका क्षितीजावर च्या मागे थोड्या उरल्यावरथांब थोडी थोड तांबड फुटू देधुकं थोड कळ्याना खेटू दे'उगवतिला जरा प्रकाशन भरू देअन तुला काळजात उद्या पुरत उरु देये अशी तू सजनी रात्र थोडी सरल्यावरनभी तारका माघे थोड्या उरल्यावर

राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...

राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...आम्ही आज तुमचे किल्ले बघतो केवल मजेसाठी ...तुमच्या मावळ्यानि कड़े चढले तुमच्या स्वप्नासाठी ...आम्ही आड़वाटे नेही थकून जातो किल्ल्यावर जाण्यासाठी ...तुमच्या सिंहाचे स्मारके आज युवकांचे दारूचे अड्डे ....सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्याचे सडे...मराठ्याच्या स्मराकांची हे हाल आता बघवत नाही ..मराठा असल्याचे किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...आमची मक्का मदीना आज धुळी खाली गदली जात आहे ..कधी राज्य कर्त्यावर आज आरक्षण मागण्याची वेळ लादली जात आहे ..राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या आजही शोधाव्या लागतात वाटा..हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन आज होऊ शकले बिरला अन टाटा ...शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...मराठ्याचे मंत्री अन राजकर्ते शिव जयंतीला निधी करोडोचा करतात गोळा.. राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना ...अन मराठी लोकांसाठी लढना-याचा नावावर दाखल होतो गुन्हा ...राजे बार झाले तुम्ही लवकर गेले नाहीतर हे दुखः तुम्हास सहन नसते झाले ..तुमच्या नावासाठी लढताना मेले ते तुमचे मावळे ..आज तुमच्या नावावर करतात राजकारण अन भरतात आपली घरे ते आमचे डोम कवळे...नशीब राजे गड तुम्ही डोंगरावर बांधले जर असते कधी जमिनीवर तर त्याचे सात बारा ह्यानी नक्कीच बदलले गेले असते...कवी ग्रीष्म करतो सगळ्याना एक विनंती रखा पावित्र्य गडाचे आज नाहीतर शोधावे लागतील पुरावे आमच्या इतिहासाचे

अर्धी रात्र

रात्र चांगली अर्धी सरून गेल्यावर मी एक कटिंग (पण )पटियाला पेग सारखी भरून घेतो तू फोडलेला एश ट्रे समोर आ वासून उभा तेंव्हा त्याच्या तोंडी एक सिगारेट देतो सुरु होतो मग एक घोट एक झुरका ...खिडकीच्या फुटलेल्या काचेतून मग आभळाला हात जातो.सिगारेट च्या धुरांच्या ढगात मग पावसाचा शोध होतो हळु हळु मग पेला गरीब अन एश ट्रे श्रीमंत होत जातोमग तुझ्या आठवनीचा खेळ सुरु होतो सिगारेट चे गरम श्वास धुरातुंन मग सर्वत्र तुझे चित्र रेखाटतात ..त्यातून सुटलेले क्षण मग कागदाला चिकटतात .पेल्यातली की सरना-या रात्रीची पण डोक्यात शिरत जाते एक नशा मिळत जाते मग एक प्रवासाला वेगळिच दिशा ......हळु हळु मग एक एक करून तुझी आठवण सतावत जाते अन मग रात्रच सोबत जागत जाते हळु हळु मनातल सार कागदावर उतरत जाते आणि मनात तुझी आठवण जागत येते ..इतक्यात दारावर एक थाप पड़ते अन मग माझी धांदल उड़ते एश ट्रे लपवायचा कुठे ?थोड्या वेळात त्याला लपउनमी दार हळूच उघडतो तू दाराशी उभी तुला मी आत घेतो ...घरात साचलेला धुर बघून तू काही विचारणार इतक्यात मी कछवा मछर अगरबत्तिच नाव घेतो .टेबलावरचा ग्लास नाकापाशी नेत मी प्यायलो काय ?याचा तू अंदाज घेत मला जवळ घेते केसात हात फिरवत माझ गीत गात रहाते....इतक्यात शेजारच आलार्म च घड्याळ सकाळ झाल्याच केकाटत जाते मी आपला डोळे चोळत उठतो बघतो तर पेन कानाला टेबलावर ग्लास तस्साच दाराला कड़ी आतून तशीच ...मी सोफ्यावर एकटाच ..फ़क्त एश ट्रे तिथून गायब मी त्याचा शोध घेतो ..तुझे एक अजुन स्वप्न समोरच्या कागदावर त्याला फाइल लाउन देतो .सकाळी माझी हालत बघून आरसा मला हसत राहतो ....फाइल मला विचारत रहाते कधी येणार माझी सखी ???

काही माणस


काही माणस जगत असतात मरणाच्या आशेने,थोडेच असतात वेडे जे चालत जातात सरळ मरणाच्या दिशेने.दगडाला वेदना टाकिचे घाव सोसतांना,त्या मूर्तीला यातना ह्या बडव्याना पोसताना.अहो वर्दिला दुखः नको त्याना सलामी,बंदुकी ढाळतात अश्रु नशिबी दहशतवादाची गुलामी.माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना,लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना.गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना,डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना.खादीला लाज वाटे ह्या नंग्याना झाकताना,खाकीचा उर फाटे त्या दंग्याना थोपताना.तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना.स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना.